Advertisement

हेडफोनच्या आवाजाचे दुष्परिणाम


हेडफोनच्या आवाजाचे दुष्परिणाम
SHARES

हेडफोन आणि स्मार्टफोन बहुतांश युवकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. कित्येकांच्या तर २४ तास कानात हेडफोन असतात. तर काहीजण दिवसातून किमान २ तास तरी हेडफोननं गाणे ऐकतात. यामुळे गाणे चांगले ऐकता येते आणि त्याचा दुसऱ्याला त्रास होत नाही. मात्र, याचा स्वत:ला किती त्रास होतो? याचा साधा अंदाज देखील तुम्हाला नसेल. किती तरी जणं हेडफोनच्या मदतीनं एवढ्या मोठ्या आवाजात ऐकतात की त्यांच्या शेजारी बसलेल्यांनादेखील ऐकू येतं.

संगीत हे मनाला शांती देतं हे मान्य आहे. पण ते किती ऐकायचं आणि त्या आवाजावर किती नियंत्रण हवं याची माहिती असणं देखील आवश्यक आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जेणेकरून हेडफोन वापरताना तुम्ही आवश्यक ती खबरदारी घ्याल

) हेडफोनच्या अतिवापराचे काही दुष्परिणामही होतात. ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा कानांसाठी हानिकारक आहे. मोबाइलमध्ये आवाज वाढवताना एक नोटीफिकेशन येतं की, यापेक्षा जास्त आवाज वाढवल्यास कानांचे नुकसान होईल. पण याकडे आपण दुर्लक्ष करतो. यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. म्हणून ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज वाढवू नये.

) जसे आपण टुथब्रश इतरांसोबत शेअर करत नाही त्याचप्रमाणे हेडफोनही इतरांसोबत शेअर करू नये. यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडून होणाऱ्या आजारांचे संक्रमण थांबवता येते. दुसऱ्याचे हेडफोन घेण्याशिवाय कोणताच पर्याय नसेल तर ते हेडफोन आधी नीट स्वच्छ करावे मगच कानात घालावे.

) हेडफोननं मोठ्या आवाजात गाणं ऐकत असाल तर कान दुखण्याच्या तक्रारी येऊ शकतात. ही समस्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि तरीही हेडफोनचा वापर करणं टाळले नाही तर तुम्ही बहिरेही होऊ शकता. यामुळे कान दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवावेकारण हेडफोन ऐकताना कान दुखणे हे मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.

) काही जणांसाठी हेडफोन हे व्यसन होऊन जाते. हेडफोनची ऐवढी सवय होते की हेडफोन वापरले नाही तर त्यांचे डोके दुखायला लागते. सततच्या आवाजामुळे लहान लहान आवाज ऐकू येणं बंद होतं. शिवाय त्यांना मोठ्या आवाजात बोलण्याची सवय देखील लागते

) मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यानं आरोग्यावर परिणाम होतो. झोपेवर परिणाम होतो

) मोठ्या आवाजानं फुफ्फुसांमध्ये हवेचा फुगा तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

) उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांचा मोठ्या आवाजामुळे रक्तदाब वाढतो.



हेही वाचा

कडुनिंबाच्या पानांचा 'असा'ही वापर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा