राज ठाकरेंची कोकण मालवणी महोत्सवाला भेट

  Malabar Hill
  राज ठाकरेंची कोकण मालवणी महोत्सवाला भेट
  मुंबई  -  

  मलबार हिल - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कोकण मालवणी महोत्सवाला भेट दिली. मनसेच्या प्रभाग क्रमांक 214 च्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा भव्य 'कोकण मालवणी महोत्सव' ताडदेव पोलीस वसाहतीच्या कंपाउंडमध्ये 30 डिसेंबर ते 8 जानेवारी पर्यंत साजरा करण्यात आला. रविवारी महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मलबार प्रभाग क्रमांक 214 मधील मनसेचे उपशाखाध्यक्ष अॅड. मुकेश भालेराव यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.