Advertisement

जेवणाशिवाय रोजच्या वापरात 'असा' होतो मीठाचा उपयोग


जेवणाशिवाय रोजच्या वापरात 'असा' होतो मीठाचा उपयोग
SHARES

आपल्या दैनंदिन आहारात एक चमचा मिठाचा आपल्या आहारात वापर होतो. मिठाशिवाय आपण जेवणाची कल्पनाही नाही करू शकत. कारण मिठामुळेच आपल्या जेवणाला चव येते. पण याही पलीकडे मिठाचा वापर करता येऊ शकतो. फक्त आहारातच नाही तर रोजच्या वापरात देखील मिठाचा उपयोग करता येऊ शकतो.


१) मिठाचा वापर आपण त्वचेसाठी स्क्रब म्हणून करू शकतो. मीठ हे त्वचेवरील मृतपेशी दूर करतं. त्यामुळे कोरडी त्वचा दूर होऊन त्वचेला चमक येते. रोजच्या आंघोळीच्या पाण्यात चमचाभर मीठ वापरल्यास तेही त्वचेसाठी उत्तम आहे.

२) जर तुमच्या शरीरावर मधमाशीनं डंख केला असेल तर वेदना होणाऱ्या जागेवर मीठ लावा. त्यामुळे तुम्हाला वेदनाही होणार नाही. तसंच सूज देखील येणार नाही.

३) कामाच्या अतिरेकामुळे डोळ्यांना ताण आणि थकवा जाणवतो. अशावेळी कोमट मिठाच्या पाण्यात स्वच्छ कापड भिजवा आणि डोळ्यांवर ठेवून काही वेळासाठी आराम करा.

४) मिठाचा वापर दातांच्या स्वच्छतेसाठी होतो. मीठ आणि बेकिंग सोडा वापरून तयार केलेली पेस्ट तुमच्या दातांना शुभ्र आणि चमकदार बनवेल. मिठामुळे हिरड्याही मजबूत होतात.

५) खराब अंडी अोळखण्यसाठी ग्लासभर पाण्यात २ चमचे मीठ घाला. आता या पाण्यात अंडे बुडवून पाहा. जर अंडे पाण्यात पूर्ण बुडालं तर समजा की अंडे चांगलं आहे. जर अंडे पाण्यावर तरंगलं तर ते खराब आहे.

६) अर्धा चमचा मीठ आणि बेकिंग पावडर एक कप पाण्यात घालून त्याच्या गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी नष्ट होते.

७) नखांची चमक वाढवण्यासाठी एच चमचा मीठ, एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा लिंबू पाणी हे मिश्रण गरम पाण्यात मिसळा. काही काळासाठी बोटे या पाण्यात ठेवा. तुमच्या नखांची चमक वाढेल.

८) चांदीचे दागिने काही काळानंतर काळसर पडतात. यासाठी कापडाच्या तुकड्यानं दागिन्यांना मीठ लावून घासा. दागिन्यांचा रंग पूर्वीसारखाच चमकदार होईल.

९) सफरचंद आणि बटाट्याचे काप उघड्यावर ठेवल्यास थोड्याच वेळात त्याच्यावर लालसर डाग दिसू लागतात. हे डाग न येण्यासाठी या फोडी मिठाच्या पाण्यात ठेवा.

१०) फ्रीज साफ करतानाही बेकिंग सोडा आणि मिठाच्या पाण्याचं मिश्रण वापरा. यामुळे फ्रिजमधले सगळे डाग सहज दूर होतील.

११) फ्लॉवरपॉटमधल्या नकली फुलांना टवटवी ठेवण्यासाठीही मीठ उपयोगी आहे. प्लास्टिकची पिशवीत मीठ टाकून फुले ठेवा. पिशवी काही वेळ चांगल्या पद्धतीनं हलवा. यामुळे फुलं फ्रेश वाटतील.

१२) फर्निचर साफ करताना ओल्या ब्रशला मीठ लावा. मग सुकायला ते फर्निचर उन्हात ठेवा. फर्निचर पिवळे पडणार नाही. 

१३) बुटांमध्ये मीठ घालून ठेवल्यानं मॉइश्चर जमून दुर्गंध येण्याचे बंद होईल.

१४) पांढऱ्या कपड्यांना डाग पडले असतील तर कोमट पाण्यात मीठ घालून त्यात तो भाग भिजवा. काही वेळानं तो भाग ब्रशनं घासून डाग घालवा.

१५) मुंग्याचा त्रास दूर करायचा तर घराच्या कोपऱ्यात आणि खिडक्यांच्या दरवाजांवर मीठ टाकून ठेवा किंवा मिठाच्या पाण्यानं पुसून घेतल्यावरही मुंग्या जातात.

१६)  ओव्हनच्या आत तेलकट थर जमा झाला असल्यास मिठाच्या पाण्यानं तो साफ करावा.  



हेही वाचा

कमोडच्या फ्लशला दोन बटणं का असतात?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा