Advertisement

विशेष मुलांच्या गरबा मटकी


विशेष मुलांच्या गरबा मटकी
SHARES

मालाड - मालाड पश्चिमेकडील 'वि. डी. इंडियन सोसायटी फॉर मेंटली चलेंज्ड' या संस्थेच्या विशेष मुलांनी गरबासाठी मटकी बनवल्या आहेत. या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या विकासासाठी आर्थिक हातभार लागावा म्हणून संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. या विशेष मुलामुलींनी विविध नक्षीकाम करून सुंदर रंगीबेरंगी गरबा मटकी तयार केल्या आहेत. गेल्या 15 दिवसांपासून या मुलांनी 150 गरबा मटकी तयार केल्या आहेत. उत्तर मुंबईतील मंदिर, गृहनिर्माण संस्थेतील नागरीक हे गरबा मटकी खरेदी करून या मुलांना प्रोत्साहन देत आहेत. या मुलांनी एक फुटापासून अडीच फुटापर्यंत गरबा मटकी बनवल्या आहेत. 150 ते 1500 रुपयांपर्यंत या गरबा मटकींच्या किंमती आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement