अंधेरीत 'बी हॅपी' आनंदोत्सव

 Lokhandwala
अंधेरीत 'बी हॅपी' आनंदोत्सव

अंधेरी - लोखंडवाला बॅक रोडवर रविवारी सकाळी इथल्या रहिवाशांची सत्ता चालेल. निमित्त असेल 'बी हॅपी' फाउंडेशननं आयोजित केलेल्या बी हॅपी रस्ता महोत्सवाचं. न्यू म्हाडा टाॅवर ते गणपती विसर्जन रोड या मार्गा रविवारी ​सकाळी 7 ते 10 या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.

या महोत्सवात या रस्त्यावर कोणतीही वाहनं चालवण्यास बंदी असेल. सायकलिंग, स्केटिंग, एरोबिक्स, योग, संगीत, फ्लॅशमाॅब, सालसा नृत्य, चित्रकला, क्रिकेट, बॅडमिंटन असे अनेक खेळ रस्त्यावर खेळले जातील. खेळून दमलात, तर तुमच्या सेवेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सज्ज असतील. या कार्यक्रमाचं उद्घाटन दिग्दर्शिका फराह खान यांच्या हस्ते होईल. इतर सेलिब्रिटीही या आनंदोत्सवात सहभागी होतील, अशी माहिती 'बी हॅपी' फाउंडेशनच्या विश्वस्त शालिनी ठाकरे यांनी दिली.

Loading Comments