Advertisement

धिस समर गो फॅशनेबल!


धिस समर गो फॅशनेबल!
SHARES

उन्हाळा म्हटला की जीव नकोसा होतो. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण होतात. त्यामुळे उन्हाळ्यात काय घालावं? नक्की काय स्टाईल करायची? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. कारण तुम्हाला तुमच्या कम्फर्टसोबतच स्टाईल आणि फॅशनचाही विचार करावा लागतो. याच स्टाईल आणि कम्फर्टचा विचार करता सध्या मार्केटमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत.

स्कार्फ

हल्ली स्कार्फ हे फॅशन स्टेटमेंट बनलं आहे. डोक्याबरोबर चेहराही पूर्णपणे झाकला जातो. त्यामुळे महिलांमध्ये स्कार्फची खूप डिमांड असते. कॉटन आणि सिंथेटिक स्कार्फला मुलींची चांगलीच पसंती आहे. जीन्स असो वा कुर्ती, सगळ्यांवर स्कार्फ उठून दिसतो. अगदी वेगवेगळ्या रंगात आणि आकारात तुम्हाला स्कार्फ मिळू शकतात. यात डार्क, लाइट आणि हल्ली नवीन आलेले प्रिंटेड स्कार्फ घेण्याकडे मुलींचा जास्त कल दिसतो. प्रिटेंडमध्ये फ्लोरल, टायगर स्किन, फ्लोरल असे स्कार्फ आकर्षक दिसतात. ६० रुपयांपासून ते ५൦൦ रुपयांपर्यंत स्कार्फच्या किंमती आहेत.

टोपी


उन्हाळ्यात स्कार्फसोबतच टोप्यांचीही मागणी आहे. यातही वेगळे आणि हटके प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. गोल आकाराची टोपी, बेसबॉल कॅप, देवानंद स्टाईल हॅट असे अनेक प्रकार आहेत. यामध्ये फॅन्सी, जीन्स, कॉटन या प्रकारातल्या टोप्यांना अधिक मागणी आहे. यामध्ये पिंक, व्हायोलेट, चॉकलेटी अशा रंगांना जास्त पसंती दिली जाते. या सर्व टोप्यांची किंमत ९० रुपयांपासून ते ३००रुपयांपर्यंत आहे. टोपी घेण्यासाठी मुलांचा कल अधिक असल्याचं दिसून येते.

कॉटनचे कपडे

उन्हाळ्यात कॉटनच्या कपड्यांना प्रचंड मागणी असते. टॉप, शॉर्ट स्कर्ट, पलाझो, शॉर्ट पलाझो आणि लाँग कुडता असे अनेक प्रकार असतात. ३൦൦ ते १൦൦൦ रुपयांपासून त्यांची किंमत सुरू होते. कॉटनच्या साड्याही बाजारात उपलब्ध असतात. 


ऑफिस वेअर म्हणून हल्ली महिला कॉटनच्या साड्यांनाच पसंती देतात. पुरुषांसाठी कॉटनमध्ये शर्ट्स आणि कुडत्यांचाही पर्याय आहे. ५൦൦ ते ६൦൦ रुपयांपासून कुडते आणि शर्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. 

सैलसर कपड्यांमध्ये प्रिंटेड पलाझो पँट तर ऑल टाईम हिट. त्यासोबतच प्रिंटेड कॉटन स्कर्ट आणि त्यावर सुती स्लिव्हलेस टॉप... वा मस्तच... एकदम झक्कास कॉम्बिनेशन. कॉटनमध्ये हल्ली प्रिंट वनपीसही उपलब्ध आहे.

खादीचे कपडे

उन्हाळ्यासाठी खादीचे कपडे हा उत्तम पर्याय आहे. खादीचे कपडे म्हटले की तरूणांनी नाकं मुरडली असतील. खादीमध्ये काही फॅशन नाही करता येत असा बहुतांश तरूणांचा समज असतो. पण फॅशनमुळे खादीलाही चांगली मागणी आहे. मुलांसाठी शर्टही उपलब्ध आहेत. यामध्ये लाईट कलर्सची जास्त चलती आहे. कारण हे कलर मुलांवर उठून दिसतात. खादीमध्येही आता वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतायेत. 

प्लेन, फ्लोरल प्रिंटचे असे अनेक पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यात मुलींसाठी तर अनेक फॅशनेबल पर्याय खादीत उपलब्ध आहेत. पोपटी, निळा, नारंगी ,गुलाबी, पांढरा असे अनेक रंग पाहायला मिळत आहेत. २൦൦ ते ५൦൦ रुपयांपासून याच्या किंमती सुरू होतात. महिलांसाठी खादीमध्ये साड्या उपलब्ध आहेत. १൦൦൦ रुपयांपासून या साड्यांच्या किंमती सुरू होतात.

जीन्स! नको रे बाबा!

उन्हाळ्यात जीन्स घालणं बहुतांशी टाळलं जातं. अशावेळी जीन्सला पर्याय म्हणजे कॉटन मटेरियल पायजमा, होजिअरी पलाझो. यावर होजिअरी मटेरियलमधील ब्लाउज, टीशर्ट किंवा गंजी टॉपही घालू शकता. ब्लॅक कलरचे कपडे उन्हाळ्यात घालणं टाळलेलंच बरं. फिक्कट शेडमधल्या कपड्यांना जास्त प्राधान्य द्यावं.



उन्हाळ्यात कपड्यांची निवड करताना या गोष्टींचा नक्की विचार करा

  • कॉटन आणि खादी कपडे वापरलेले उत्तम
  • हेवी वर्क असलेले कपडे घालणं टाळावं. दिसायला छान दिसत असले तरी जाड आणि नक्षीकाम असलेल्या कपड्यांमध्ये अधिक गरम होऊ शकतं
  • डार्क शेडचे कपडे टाळावेत. त्यापेक्षा फिक्कट रंगाचे कपडे खरेदी करावेत. पांढऱ्या रंगाचे कपडे अगदी उत्तम
  • आरामदायी आणि सुटसुटीत कपडे घालावेत. ज्यामुळे तुम्हाला कोंडल्यासारखे वाटणार नाही
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा