Advertisement

उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजसचा कारनामा, बघा काय शोधून काढलंय?

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरेनं २०१५ मध्ये पहिल्यांदा या प्रजातीला पाहिले होतं. यानंतर याच्या व्यवहारवर विस्तारानं अध्ययन केला.

उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजसचा कारनामा, बघा काय शोधून काढलंय?
SHARES

सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात सापाची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे. या सापाचे नाव शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजसच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. सापाची ही प्रजाती 'मांजर साप' म्हटल्या जाणाऱ्या श्रेणीमध्ये गणली जाते. ही प्रजाती बोईगा प्रजातीशी मिळतीजुळती आहे.


ठाकरेज कॅट स्नेक

तेजस ठाकरेनं २०१५ मध्ये पहिल्यांदा या प्रजातीला पाहिले होतं. यानंतर याच्या व्यवहारावर विस्तारानं अध्ययन केले. तेजसनं हा साप ब्योरा जैवविविधता संरक्षण संस्थेकडे सुपूर्द केला आणि पुढील शोध कार्यात मदत केली. यामुळे या सापाच्या प्रजातीचं नाव 'ठाकरेज कॅट स्नेक' (वैज्ञानिक नाव बोईगा ठाकरे) असं ठेवण्यात आलंय. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) जर्नलमध्ये सापाच्या नवीन प्रजातींचे वर्णन करणारे संशोधन पत्र प्रकाशित करण्यात आले आहे.


असी आहे सापाची प्रजाती

जंगलातील नद्यांजवळ हा साप आढळत असून  रात्री अधिक सक्रिय असतो. हा साप विषारी नसून ते ३ फुटांपर्यंत वाढू शकतात.  बेडकाची अंडी हे या सापांचा आहार आहे.  यापूर्वी पश्चिम घाटातील सापांमध्ये याप्रकारची लक्षणं आढळली नव्हती.


ट्विटरवरून आदित्यची माहिती

तेजसचा मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांनी सापाचा फोटो ट्विटर शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'आमचे बंधू तेजस ठाकरे यांनी पश्चिम सह्याद्री घाटामधून सापाची ही प्रजात शोधली आहे. या सापाचं नाव तेजसच्या नावावरुनच ठेवलं आहे.'


पावसाळ्यात संशोधनास सुरुवात

तेजस ठाकरे आणि त्यांची टीम पावसाळ्यात पश्चिम घाटात अनेकदा संशोधनासाठी जाते. या काळात ते अनेक प्राणी आणि घाटातील जीवांचा शोध घेतात. त्यांचं निरीक्षण करतात. काही महिन्यांपूर्वीच तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रात आढळणाऱ्या पालींच्या नव्या दोन प्रजाती शोधून काढल्या होत्या. या पाली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आढळल्यात. या पालींच्या प्रजातीचा शोध तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर यांनी लावला होता.

सातारा जिल्ह्यातील कोयना खोऱ्यात सापडलेल्या पालीच्या प्रजातीला 'निमस्पिस कोयनाएन्सिस' आणि आंबाघाटात सापडलेल्या प्रजातीला 'निमस्पिस आंबा', अशी नावं देण्यात आली होती. या आधी तेजस ठाकरे यांनी खेकड्यांची एक दुर्मिळ प्रजातीही शोधली होती.हेही वाचा

जागतिक पर्यटन दिन

संबंधित विषय
Advertisement