Advertisement

पार्टी, लग्नासाठी 'इथे' मिळतील भाड्याने कपडे!


पार्टी, लग्नासाठी 'इथे' मिळतील भाड्याने कपडे!
SHARES

पार्टीत किंवा लग्नसमारंभात वापरले जाणारे महागडे कपडे एखाद-दुसऱ्यांदाच वापरले जातात. ते कपडे रोज ऑफिस किंवा कॉलेजला घालता येत नाहीत. मग हेच महागडे कपडे कपाटाच्या एका कोपऱ्यात पडून राहतात. यावर पर्याय म्हणजे रेंटेड कपडे. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं, तर कपडे भाड्यानं घ्यायचे. भाड्याचे कपडे?

आता ही संकल्पना काही जणांना खटकली असेल. पण विचार केलात, तर हा उपक्रम तुमच्यासाठी फायद्याचाच आहे. टीव्ही, मालिकांमध्ये दाखवले जाणारे महागडे आणि डिझायनर कपडे क्वचितच घेऊ शकत असतील. सर्वांनाच हे कपडे परवडत नाहीत. समजा डिझायनर कपडे घेतले, तरी ते किती वेळा आपण घालतो? याच प्रश्नामुळे भाड्यानं कपडे घेण्याच्या संकल्पनेचा जन्म झाला. या संकल्पनेतून तुम्ही महागडे ड्रेस ठराविक किंमतीत दोन-तीन दिवसांसाठी भाड्यानं घेऊ शकता आणि वापरून झाले की पुन्हा त्यांना परत करायचे. याच संकल्पनेवर आधारित एक शॉप वांद्रेमध्ये सुरू करण्यात आलं आहे. 'द सोर्स' असं या शॉपचं नाव आहे.या शॉपचं वैशिष्ट्य काय?

'द सोर्स' या शॉपमध्ये सर्व प्रकारचे ड्रेसेस, टॉप्स, साड्या असे फॅशनेबल आणि स्टायलिश कपडे मिळतील. जर तुम्हाला चांगले टॉप्स हवे असतील, तर त्याची किंमत ६൦൦ रुपयांपासून सुरू होते. ६൦൦ रुपये हे थोडे जास्त वाटत असतील. पण एका कार्यक्रमासाठी ही किंमत नक्कीच कमी आहे. पार्टी वेअरमध्ये म्हणजेच गाऊन आणि साडी यांची किंमत ३൦൦൦ रुपयांपासून सुरू होते. याशिवाय बेल्ट्स, शूज, कपड्यांवर मॅचिंग अॅक्सेसरिज देखील या शॉपमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहेत!फक्त महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठी देखील इथं कपडे उपलब्ध आहेत. ब्लेजर्ससाठी तुम्हाला १५൦൦ रुपये इतकं भाडं मोजावं लागेल. तर शर्ट (६൦൦), शूज (१५൦൦), सनग्लासेस (१५൦) आणि वॉचेस (१५९൦) इतके पैसे तुम्हाला मोजावे लागतील. तीन दिवस तुम्हाला हे कपडे भाड्यानं घेता येतील. जर तुम्हाला तीनहून अधिक दिवस लागणार असतील, तर त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.


कुठे आहे शॉप?

द सोर्स, विंटेज पर्लजवळ, पाली विलेज, वांद्रे ( पश्चिम)हेही वाचा

हिवाळा आला, ऊबदार कपडे खरेदी करताय ना?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा