इथे करा नव्या वर्षाचं स्वागत...

 Pali Hill
इथे करा नव्या वर्षाचं स्वागत...

मुंबई - बघता बघता 2016 वर्ष संपलं. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजले की सगळेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयार असतील. पण, सेलिब्रेशन कसं आणि कुठे करावं असा प्रश्न पडला असेल, तर आम्ही तुम्हाला मुंबईतले काही असे स्पॉट सांगतोय, जिथे तुम्ही आनंदानं नव्या वर्षाचं स्वागत करू शकाल.

गिरगाव चौपाटी - जर तुम्हाला मोकळं आकाश आणि समुद्रकिनारा आवडत असेल, तर हा स्पॉट तुमच्यासाठी अगदी योग्य. भेळपुरी, पाणीपुरी, आईस्क्रिमचा आनंदही तुम्ही येथे घेऊ शकता. तसंच मरिन ड्राइव्ह हा मुंबईचा रात्री झगमगणारा रत्नहार पाहण्याचा मस्त अनुभवही तुम्हाला बोनस मिळेल...

कुलाबा - तुम्हाला पार्टी करायची असेल, तर दक्षिण मुंबईतलं कुलाबा गाठा. एकदम बेस्ट स्पॉट. कारण इथे तुम्हाला मोठ-मोठे पब, गेट वे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेलसारखा मन मोहून टाकणारा परिसर बघायला मिळेल.

वांद्रे - वांद्र्यातही मोठ मोठ पब, सिनेमागृह,डिस्को, कॅफे कॉफी डे असे अनेक पर्याय आहेत. मोकळ्या हवेत सेलिब्रेशन करायचं, तर जुहू चौपाटी, बँड स्टँड असे स्पॉटही तुम्हाला नक्कीच आवडतील.

या शिवायही मुंबईत अशी बरीच ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही आनंद आणि जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत करू शकाल.

Loading Comments