Advertisement

मुंबईच्या रस्त्यांवर गाणारा तुर्कस्थानी तरूण!


SHARES

मुंबई - तुर्कस्थानचा शॅगी. त्याचं नाव जितकं वेगळं तितकाच त्याचा ध्यासही. 26 वर्षीय शॅगीला फिरायची प्रचंड हौस आहे. आणि आपली हीच हौस पूर्ण करण्यासाठी शॅगी जगभर फिरतोय. पण त्याच्या या फिरण्याची तऱ्हा मात्र अजब आहे. ज्या देशात पोहोचणार, तिथे फिरतानाच गिटार-बाजा वाजवायची, गाणं गायचं आणि त्यातून पैसे जमा करून पुढच्या प्रवासाचा खर्च करायचा. याच जोरावर शॅगी जॉर्जिया, अझरबैजान आणि इराण या देशांत फिरून आलाय. आणि सध्या हा अवलिया भारतात आणि त्यातही मुंबईत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा