• जुनी संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या व्हिंटेज कार

SHARE

'ओल्ड इज ऑल्वेज गोल्ड' ही म्हण व्हिंटेज कारच्या बाततीत तंतोतंत जुळते. कार कितीही जुनी असो ,पण तिच्यावरचं मालकाचं प्रेम काही कमी होत नाही. त्यातच ती जर गोऱ्या साहेबाच्या काळातील असेल, तर बघायलाच नको. कारण ही कार फक्त कार नसते तर ते असतं त्या मालकाचं पहिलं प्रेम. अगदी हीच बाब मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'व्हिंटेज कार' प्रदर्शनात ठळकपणे जाणवली.     
'दादर सांस्कृतिक मंच'तर्फे रविवारी दादरमधल्या महापौर निवास आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथं व्हिंटेज गाड्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. व्हिंटेज कार्स एका छताखाली पाहायला मिळाव्यात, या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं
फोर्ड, फियाट ११००, शेवरले, मर्सिडीज, वॉल्वो, मॉरेस, मारुती सुझुकी ८००, हिंदुस्थान मोटर्सची अॅम्बेसिडर अशा ६० व्हिंटेज कार प्रदर्शनात दिमाखात उभ्या होत्या
फक्त कारच नाही तर प्रदर्शनाता मोटरसायकल देखील होत्या. जवळपास २५ मोटरसायकल या प्रदर्शनाता पाहायला मिळाल्या
व्हिंटेज गाड्यांचा ऐटबाजपणा आणि डामडौल मुंबईकरांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा ठरला.मराठी कुटुंबानं जपला ९० वर्षांचा वारसा

प्रदर्शनात अनेक जण पिढ्यानपिढ्यापासून चालत असलेला कार जतनाचा वारसा जपताना दिसले. प्रदर्शनात १९३० मधील फोर्ड कंपनीची मॉडेल '' ही गाडी एका मराठी व्यक्तीने तब्बल ९० वर्षांपासून जपून ठेवल्याचं दिसलं. शिवाय दिवंगत अभिनेते ए. के. हंगल यांची १९७२ मधली 'बीटल' ही गाडीही या प्रदर्शनात पाहायला मिळाली.९६२ ची फियाट देखील रवी नेने यांनी काही वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. ही फियाटसुद्धा या प्रदर्शनाची शान वाढवत होती. १९७७ साली व्हेईकल फॅक्टरी जबलपूर यांची जोंगा ही लष्करानं वापरलेली गाडी प्रदर्शनात बघता आलीप्रत्येक व्हिंटेज कारचा थाट निराळा

चकचकीत रंगाच्या या आलिशान कारमध्ये सहा-सात माणसं बसू शकतील, अशी ऐसपस जागा, चामड्याच्या शानदार सिट्स, फोल्ड करता येणारे छत, चालकाच्या पुढची काचही उघडणारी, स्टिअरिंगला लागूनच रायफल सॉकेट अशा किती तरी सोई व्हिंटेज कारमध्ये पाहायला मिळल्याशिवाय दोन रंगांमधील मोटार हल्ली बघायला मिळणं विरळाच. पण बहुतेक व्हिंटेज कारमध्ये रंगसंगतीची किमया दिसून आली. पिवळ्या, हिरव्या, पांढऱ्या, काळ्या अशा विविधरंगी शानदार आणि आलिशान जुन्या गाड्या पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले.सर्वात जुनी कार प्रदर्शनाची खासियत

१९१९ मधील सर्वात जुनी कार या प्रदर्शनाचं आकर्षण ठरली. सिट्रोन असं ९८ वर्षे जुन्या कारचं नाव असून अब्बास जसदनवाला हे या कारचे मालक आहेतसिट्रोन ही एक फ्रेंच कंपनी आहे. फ्रेंच कंपनीनं त्यांच्या कारखान्यात बनवलेली ही पहिली गाडी आहे. ४० वर्षांपूर्वी अब्बास जसदनवाला यांनी ही कार विकत घेतली होती. व्हिंटेज कार खरेदी करणं, त्यांचा सांभाळ करणं हा अब्बास यांचा छंद आहे.१९ व्या शतकातील व्हिंटेज आणि क्लासिक गाड्या मुंबईकरांसाठी पर्वणीच ठरली. दादर क्लासिक कार फिएस्टाच्या निमित्तानं मुंबईकरांना जुनी संस्कृती, जुनी परंपरा अनुभवता आली.   

फोटो सौजन्य - मणीकंदनहेही वाचा- वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायचीये? मग निसर्गावर प्रेम हवंच - सागर गोसावी

संबंधित विषय
ताज्या बातम्या