Advertisement

रंगीबेरंगी उबदार स्वेटर बाजारात दाखल


रंगीबेरंगी उबदार स्वेटर बाजारात दाखल
SHARES

सीएसटी - थंडीची चाहूल सुरू होताच मुंबईकरांची पावलं वळतायत ती स्वेटर खरेदीकडं. सीएसटी परिसरात स्वेटर विक्रीचा बाजार भरलाय. यामध्ये हातांनी विणलेले  रंगीबेरंगी फॅशनेबल वुलनचे स्वेटर सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

फिकट रंगांपासून ते भडक रंगांपर्यंत, प्लेन कपड्यांपासून ते फुलं, कार्टून, विविध नक्षीकाम अशा डिझाईनमधील उबदार कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. लहानग्यांमध्ये कार्टूनच्या टोप्या, स्वेटर विशेष आकर्षण ठरत आहे. तरुणांसाठी चॉकलेटी, काळ्या, निळ्या रंगातील स्वेटर, जॅकेट, हातमोजे असून तरुणींसाठी गुलाबी, पिवळ्या, आकाशी रंगातील शॉल, स्कार्फ येथे विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यांची किंमत 500 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत आहेत. तर हिमाचल प्रदेश, ओरिसा या ठिकाणांहून मुंबईत स्वेटर विकायला दरवर्षी येत असल्याचं विक्रेते अकबर युसुफवाला यांनी सांगितलं. 

संबंधित विषय
Advertisement