Advertisement

... म्हणून १ एप्रिलला साजरा होतो 'एप्रिल फूल'

१ एप्रिल म्हणजे सर्वांना फूल बनवायचा दिवस. कुणाला कसं मूर्ख बनवायचं याच्या युक्त्या प्रत्येक जण लढवतो. तसं तर इतर दिवशी आपण एकमेकांना मूर्ख बनवतच असतो. पण तरी हा खास एक दिवस मूर्खांचा दिवस म्हणून ओळखला जातो.

... म्हणून १ एप्रिलला साजरा होतो 'एप्रिल फूल'
SHARES

आज १ एप्रिल... १ एप्रिल म्हणजे सर्वांना फूल बनवायचा दिवस. कुणाला कसं मूर्ख बनवायचं याच्या युक्त्या प्रत्येक जण लढवतो. तसं तर इतर दिवशी आपण एकमेकांना मूर्ख बनवतच असतो. पण तरी हा खास एक दिवस मूर्खांचा दिवस म्हणून ओळखला जातो.

लहान असताना एप्रिल फूल बनवण्यासाठी काय युक्त्या लढवल्या जायच्या. 'एप्रिल फूल डब्बा गुल' म्हणत एखाद्याला उल्लू बनवल्याचा आनंद लुटला जायचा. पण एप्रिल फूल केव्हापासून आणि का साजरा केला जातो याबद्दल क्वचितच कुणाला माहित असावं. आज आम्ही तुम्हाला या मागचा इतिहास सांगणार आहोत.


कधीपासून सुरुवात?

एप्रिल फूलची संकल्पना आपल्याकडे अमेरिकेतून आली आहे. एप्रिल फूल या दिवसामागची कथा काहीशी गंमतीशीर आहे. जोक आणि प्रँकशी जोडलेल्या या दिवसाला स्पष्ट असा काही इतिहास नाही. पण या दिवसाबद्दलच्या काही वेगवेगळ्या गोष्टी मात्र समोर आल्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट या १५८२ पासून सुरु झाली आहे.

१५८२ मध्ये पोप तेरावे ग्रेगरी यांनी ज्युलिअन दिनदर्शिका बदलून ग्रेगरिअन दिनदर्शिका आणली. याआधी सगळेच जण १ एप्रिलला नववर्ष साजरे करायचे. या नव्या दिनदर्शिकेनुसार आता सगळ्यांनी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरं करावं असा आदेश काढण्यात आला. अनेकांना हे काही रुचलं नाही. त्यामुळे लोकांनी याला कडाडून विरोध केला, आंदोलन झाली. पण हळूहळू लोकांनी निर्णय मान्य केला.

पण काहींनी १ जानेवारीलाच नववर्ष साजरा करण्यास ठाम नकार दिला. आम्ही १ एप्रिललाच नववर्ष साजरं करू या निर्णयावर ते ठाम राहिले. त्यामुळे या सगळ्यांनाचा मूर्ख ठरवण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मुर्खांचा दिवस म्हणजे ‘एप्रिल फूल’ डे साजरा करण्यात येऊ लागला. फ्रान्समधली ही गोष्ट युरोपभर पसरली आणि त्यानंतर ‘एप्रिल फूल’ साजरा करण्यात येऊ लागला.


अनेक कथा


एप्रिल फूलबद्दल दुसरी गोष्ट अशी की, कॉन्सन्टाइन द ग्रेट याच्या काळात काही विदूषक राजदरबारात गेले. आपण या राजापेक्षाही चांगला कारभार करू शकतो असं त्यांचं मत होतं. आता उदार राजांनी एक दिवसासाठी गंमत म्हणून त्यातल्या एका विदूषकाच्या हाती राज्यकारभार सोपवला. तर एका विदूषकानं फर्मानच काढलं. वर्षातला एक दिवस सगळ्या जनतेनं मुर्खासारखं वागायचं आणि विदूषकासारखे चाळे करायचे. विदूषकाचा हेतू एवढाच की इतरांना हसवणं किती कठीण असतं हे लोकांना दाखवून द्यावं आणि तेव्हा पासून ‘फूल डे’ साजरा करण्याची परंपराच सुरू झाली.

एप्रिल फूल या दिवसाचा पहिला उल्लेख ज्योफ्री चॉसरच्या 'द कॅंटरबरी टेल्स' मध्ये केला होता.

तर काही ठिकाणी हा दिवस ग्रीक-रोमन उत्सव हिलेरियाशी फेस्टीव्हलशी देखील संबंधित असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा दिवस प्राचीन ग्रीक देवता सिबले यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्यात मास्करेड (masquerades, परेड (parades) आणि विनोदांचा (jokes) समावेश होता.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा