जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी तैनात असलेल्या तरुणावर वीज कोसळली
06:12 PM, Sep 28 IST
तेजुकायाचा गणराय विसर्जनासाठी चौपाटीवर पोहोचला
01:11 PM, Sep 28 IST
लालबागच्या रस्त्यांवर गुलालाची उधळण. महत्त्वाच्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ; मंडळांमधील मित्रत्वानं जिंकली मनं
12:00 PM, Sep 28 IST
लालबागच्या राजाच्या मिरवणूकीला सुरुवात
10:53 AM, Sep 28 IST
माटुंगा वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
टिळक ब्रिज : खोदादाद सर्कल (दादर टी.टी.) ते कोतवाल गार्डन पर्यंत वाहतूकीस बंदी राहील.
मनकिकर मार्ग : डंकन क्याजवे ते सायन तलाव पर्यंत गणपती विसर्जन मिरवणुककरीता वाहतूकीस बंदी राहील.
डॉ. बी. ए. रोड : महेश्वरी उदयान ते सुपारीबाग जंक्शन पर्यत दक्षिण वाहीनी वाहतूकीस बंदी राहील.
10:52 AM, Sep 28 IST
माहिम वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
संपुर्ण ६० फिट रोड : कुंभारवाडा जंक्शन ते केमकर चौक दोन्ही वाहीन्या वाहतूकीकरीता बंद.
माहिम सायन लिंक रोड ( रहेजा ब्रिज) : केमकर चौक ते रहेजा हॉस्पीटल दोन्ही वाहीन्या उतरणी पर्यत.
टी.एच.कटारिया मार्ग :- गंगाविहार जंक्शन ते शोभा हॉटेल जंक्शन पर्यंत दक्षिण वाहीनी वाहतूकीस बंद राहील.
माटुंगा लेबर कॅम्प रोड : गंगाविहार जंक्शन ( कटारीया ब्रिज मार्गे) ते कुंभारवाडा जंक्शन पर्यंत दक्षिण वाहीनी वाहतूकीस बंद राहील
10:48 AM, Sep 28 IST
दादर वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : दक्षिण वाहिनीवरील वाहतुक ही यस बँक सिग्नल येथून श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन पर्यंत वाहतुकीस बंद.
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग: उत्तर वाहिनी श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन येथून यस बँक जंक्शन पर्यंत फक्त गणपती विसर्जन मिरवणुकांकरीता शिवाजीपार्क चौपाटी येथे जाणेकरीता राखीव.
रानडे रोड : रानडे रोड हा पानेरी जंक्शन येथून चैत्यभुमी जंक्शन ( स्वांतत्रवीर सावरकर मार्ग) पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहील.
संत ज्ञानेश्वर मंदिर रोड : चैत्यभुमी जंक्शन ( स्वांतत्रवीर सावरकर मार्ग) ते चैत्यभुमी गणेश विसर्जन चौपाटी पर्यंत वाहतुकीस बंद राहिल.
जांभेकर महाराज मार्ग : सुर्यवंशी हॉल चौपाटी, द. स. बाबरेकर रोड यांना जोडणारा पर्यंत आवश्यकते नुसार वाहतुकीस बंद राहिल.
केळूस्कर रोड दक्षिण मार्ग : संपूर्ण रस्ता वाहतुकीकरीता बंद राहील
केळूस्कर रोड उत्तर मार्ग : संपूर्ण रस्ता वाहतुकीकरीता बंद राहील
एम. बी. राऊत रोड : संपूर्ण रस्ता वाहतुकीकरीता बंद राहील.
टिळक उड्डाणपूल : कोतवाल गार्डन सर्कल येथून दादर टी टी सर्कल पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहिल.
बाळ गोविंददास रोड : जे. के. सावंत मार्ग ते एल. जे. रोड पर्यंत एक दिशा मार्ग राहिल.
एस. के. बोले रोड : एस. के. बोले रोड हा श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत आवश्यकते नुसार एक दिशा मार्ग राहिल.
10:46 AM, Sep 28 IST
काळबादेवी वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
जे. एस. एस. रोड : संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अल्फ्रेड जंक्शन) ते समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
विठ्ठलभाई पटेल मार्ग : कस्तुरबा गांधी चौक ( सी पी टैंक सर्कल) ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेल नित्यानंद जंक्शन).
बाबा साहेब जयकर मार्ग : डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) ते डॉ. यशवंत सामंत चौक ( खत्तर गल्ली नाका).
राजा राम मोहन रॉय रोड : चारुशीला गुप्ते चौक (चर्नी रोड स्टेशन जंक्शन) ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
कावसजी पटेल टैंक रोड : तीन बत्ती नाका (गुलालवाडी सर्कल) ते कस्तुरबा गांधी चौक (सी पी टँक सर्कल) दरम्यानची वाहतूक बंद.
संत सेना मार्ग (दुसरा कुंभारवाडा रोड ) : एम एस अली रोड येथील जंक्शन ते संत श्री पुनित महाराज चौक ( नानुभाई देसाई रोड येथील जंक्शन).
सरदार वल्लभभाई पटेल रोड : गोल देऊळ ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चीक (प्रार्थना समाज जंक्शन).
पर्यायी मार्ग
गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव, ठाकूर व्दार, व्हीपी रोड, जे एस एस रोड, एस व्ही पी रोड, राजाराम मोहन रॉय रोड आणि त्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
10:45 AM, Sep 28 IST
आझाद मैदान वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
महानगरपालीका मार्ग:- सी. एस. एम. टी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन ) पर्यंत वाहतुक (आवश्यकतेनुसार ) प्रतिबंधित असेल.
पर्यायी मार्ग
वाहन चालकांना मेट्रो जंक्शन च्या दिशेने वाहतुक टाळण्याचा सल्ला देण्यांत येत आहे. (अत्यंत आवश्यक किंवा निकडीचे नसल्यास)
10:43 AM, Sep 28 IST
कुलाबा वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
नाथालाल पारेख मार्ग:- भाई बंदरकर चौक (बधवार पार्क जंक्शन) ते सय्यद मोहंमद जमादार चौक ( इंदु क्लिनिक जंक्शन) पर्वतचा मार्ग
वाहतुकीकरीता दोन्ही वाहिन्यांवर बंद राहील.
कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग:- झुलेलाल मंदिर चीक (पांडे लेन जंक्शन) ते संत गाडगे महाराज चौक ( धनपाल नाका) पर्यंतचा मार्ग वाहतुकीकरीता बंद राहील.
रामभाऊ साळगांवकर मार्ग:- व्होल्गा चौक ते कमल मोरारका चौक दरम्यानचा मार्ग हा वाहतुकीस (आपत्कालीन वाहने वगळून) बंद राहील.
पांडे मार्ग :- पांडे मार्ग हा एक दिशा मार्गाच्या ऐवजी दुहेरी वाहतुकीस उपलब्ध राहील.