Advertisement

सुव्रत-प्राजक्ताच्या आवाजात तामिळ गाणं

मराठमोळे कलाकार सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांनी या सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत थेट तामिळ गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं मराठी सिनेमात आहे. 'डोक्याला शॉट' या मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे.

सुव्रत-प्राजक्ताच्या आवाजात तामिळ गाणं
SHARES

आजवर बऱ्याच कलाकारांनी स्वतःच्या आवाजात गाणं गात आपल्या चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. मराठमोळे कलाकार सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांनी या सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत थेट तामिळ गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं 'डोक्याला शॉट' या मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे.


रोमँटिक गाणं

नुकताच 'डोक्याला शॉट' या सिनेमाचा ट्रेलर आणि टायटल साँग प्रदर्शित झालं असून, मराठी आणि तामिळ अशा दोन भिन्न संस्कृतीचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या सिनेमात महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघांनी या सिनेमात एक रोमँटिक तामिळ गाणं गायलं आहे.


एका दिवसात गाणं रेकॉर्ड

या सिनेमांचं दिग्दर्शन शिवकुमार पार्थसारथी यांनी केलं आहे. याबाबत सुव्रत आणि प्राजक्ता म्हणाले की, या सिनेमात आम्हाला एक गाणं गायचं असल्याचं समजलं तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो. पण ज्यावेळी हे गाणं मराठीत नसून तामिळ भाषेत गायचे समजलं त्यावेळी आम्ही जरा गोंधळलोच. याआधी आम्ही कधीच गाणं गायलं नव्हतं. प्राजक्ताला गाण्याची थोडी फार ओळख होती, परंतु मी या सगळ्यात अगदी नवखा होतो. या सर्व गोष्टी शिव सरांना समजल्यावर त्यांनी गाणं रेकॉर्ड करायच्या काही दिवस आधी 'ते' गाणं, त्याचा अर्थ मराठीत पाठवले. त्यानंतर आम्ही ते गाणं ऐकून, वाचून सराव करायला सुरुवात केली. सोबतच सूर नीट यावे, यासाठी वारंवार रियाज केला. सरतेशेवटी गाण्याच्या रेकॉर्डिंगला आम्ही गेलो आणि एका दिवसात हे गाणं रेकॉर्ड केलं.


१ मार्चला प्रदर्शित

तामिळ भाषेतील या गाण्याला नवोदित संगीतकार श्रीकांत-अनिता यांनी संगीत दिले आहे. हे गाणं मराठीत सुद्धा प्रदर्शित होणार आहे. मराठी कलाकारांनी तामिळ भाषेत गाणं गाणे, ही बहुदा पहिलीच वेळ असावी. हे गाणं लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. उतुंग हितेंद्र ठाकूर आणि 'व्हिवा इनएन प्रॉडक्शन' यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून आहे. हा सिनेमा १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, रोहित हळदीकर ओंकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.



हेही वाचा -

भूषण-मानसीचं रोमँटिक 'रंग तुझा गंध तुझा...' गाणं

प्रवाशांकरीता मुंबई सेंट्रल स्थानकात ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा