Advertisement

भूषण-मानसीचं रोमँटिक 'रंग तुझा गंध तुझा...' गाणं

कोकणातील शिमगोत्सवावर आधारित असलेला 'शिमगा' हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली होती. या सिनेमातील 'रंग तुझा गंध वेगळा...' हे रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

भूषण-मानसीचं रोमँटिक 'रंग तुझा गंध तुझा...' गाणं
SHARES

कोकणातील शिमगोत्सवावर आधारित असलेला 'शिमगा' हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली होती. या सिनेमातील 'रंग तुझा गंध वेगळा...' हे रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.


राजेश-सुकन्या जोडी

'शिमगा' या चित्रपटातील पाहिलं गाणं रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर दुसरं गाणं 'रंग तुझा गंध तुझा' हे गाणं ही रसिक दरबारी सादर झालं आहे. या रोमँटिक गाण्यात भूषण प्रधान आणि मानसी पंड्या ही नटखट जोडी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच राजेश आणि सुकन्या ही जोडी जमली आहे.




ढोल, ताशांचा वापर

या गाण्यात नायक आणि नायिका यांच्यामधील प्रेमभाव दिसतात. याशिवाय प्रेमाचा सुंदर, तरल अनुभव या गाण्यातून येतो आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात ढोल, ताशांचा वापर केला आहे. त्यामुळे मराठमोळ्या थाटातील हे गाणं अबालवृद्धांना ठेका धरायला लावणारं असल्याचं सांगण्यात येत आहे. गाण्यात सुरुवातीलाच मानसी ढोल वाजवताना दिसत आहे.




चित्रीकरण कोकणात

मूळची गुजराती असणाऱ्या मानसीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या गाण्याचं चित्रीकरण कोकणात झालं असून कोकणातील महत्वपूर्ण अशा 'शिमगा' या सणावर आधारित हा चित्रपट आहे. पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सायली पंकज आणि सौरभ साळुंके यांचा आवाज लाभला आहे. तर वलय यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केले आहे.




१५ मार्चला प्रदर्शित

श्री केळमाई भवानी प्रॉडक्शनची निर्मित 'शिमगा' हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी केले आहे. तसेच प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील निलेश कृष्णा यांनी सांभाळली आहे.





हेही वाचा -

पुलवामाचा बदला घेत दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर - विजय गोखले

मुंबई हाय अलर्टवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा