Advertisement

मुंबई हाय अलर्टवर

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला दहशतवाद्यांनी नेहमी लक्ष्य केलं आहे. या पूर्वीही पकडण्यात आलेल्या संशयितांकडून लोकल आणि एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवून आणण्याचे कट उधळवले आहेत. त्यामुळे लोकलच्या प्रत्येक स्थानकावर गस्त वाढवली आहे. सीसीटिव्ही कंट्रोल रूममधून नजर ठेवली जात आहे. तसंच मुंबईत प्रवेश करणाऱ्या चारही एंट्री पाॅईंटवर गस्त वाढवण्यात आली आहे.

मुंबई हाय अलर्टवर
SHARES

पुलवामा हल्याच्या बदला मंगळवारी पहाटे भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्याचा खात्मा करत घेतला. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळेच मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या स्थळांवरील गस्त वाढवली आहे. 


गस्त वाढवली

पुलवामा हल्यानंतरच देशातील सर्व महत्वाची ठिकाणे आणि शहरांमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  भारताने मंगळवारी पहाटे मिराज फायटर जेटच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मिरमध्ये दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. भारताने केलेल्या या हल्ल्याला पाकिस्तानकडूनही प्रतिउत्तर मिळू शकते. त्यामुळे देशातील सर्व शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला दहशतवाद्यांनी नेहमी लक्ष्य केलं आहे.

या पूर्वीही पकडण्यात आलेल्या संशयितांकडून लोकल आणि एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवून आणण्याचे कट उधळवले आहेत.  त्यामुळे लोकलच्या प्रत्येक स्थानकावर गस्त वाढवली आहे. सीसीटिव्ही कंट्रोल रूममधून नजर ठेवली जात आहे. तसंच मुंबईत प्रवेश करणाऱ्या चारही एंट्री पाॅईंटवर गस्त वाढवण्यात आली आहे. शहराला लागून असलेल्या समुद्रातील ९४ लँडीग पाॅईंटवरही पोलिसांनी गस्त वाढवली आहे. तर विमानतळावरील सुरक्षेतही वाढ केली आहे. 


पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसंच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे. 


 आजचा भारत हा पूर्वीचा भारत राहिला नाही. भारतीय लष्कराचा आणि वायुसेनेचा अभिमान वाटतो. शक्ती काय असते हे खऱ्या अर्थाने पाकिस्तानला समजेल. भारताच्या गुप्तचर संस्था आणि सर्व यंत्रणा सक्षम आहेत. सर्व पातळ्यांवर काम सुरु आहे. मुंबई नेहमीच हाय अलर्टवर असते. मुंबई हाय अलर्टवर असते याचा अर्थ नागरिकांनी पॅनिक व्हायची गरज नाही. सर्व यंत्रणा आपापल्या पातळीवर योग्य काम करत असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नाही.

 - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 


हेही वाचा - 

भारताचा पाकवर एअर स्ट्राईक, देशभरातून हल्ल्याचं स्वागत

मुंबईची लोकल पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा