Advertisement

मुंबईची लोकल पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

पुलवामा येथील दहशतवादी हल्यानंतर पून्हा एकचा चर्चेत आलेल्या हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेने पून्हा एकदा मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेकडून ही धमकी भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे

मुंबईची लोकल पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर
SHARES

मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दहशतवाद्यांचे सावट पून्हा घोंगावू लागले आहे. दहशतवाद्यांनी तीन महिन्यात घातक हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारतीय गुप्ताचार यंत्रणेने सर्व स्थानकांवरील सुरक्षा रक्षकांना अर्लट राहण्याचे आदेश दिले असून महत्वाच्या स्थानकांवरील सुरक्षेत वाढ केली आहे.


रेल्वेच्या सुरक्षेत वाढ

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्यानंतर पून्हा एकचा चर्चेत आलेल्या हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेनं पून्हा एकदा मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेकडून ही धमकी भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही दहशतादी संघटना दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनांपैकी एक आहे. हाफिज सईदने याची स्थापना अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात केली होती. गुप्तचर संघटनेनं धमकीची माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना बुधवारी दिल्या. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


ड्रोनने रेल्वे रूळांवर ठेवणार लक्ष

 काही दिवसांपूर्वी या दहशतवाद्यांनी रेल्वे ट्रकवर घातपात घडवून आणण्यासाठी हत्यार किंवा स्फोटकाचा वापर न करता मोठी दुर्घटना घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती मल्टी एजन्सी सेंटर (मॅक)ने काही दिवसांपूर्वी सर्व सुरक्षा विभागांना दिली होती. रेल्वे रूळ कमकुवत करून भीषण दुर्घटना घडवण्याचा दहशत वाद्यांचा मनसूबा असल्याने लवकरच रेल्वे रुळांवर ड्रोनची गस्त ठेवली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. शहरात लाखो नागरिक दररोज रेल्वेनं प्रवास करतात. त्या तुलनेत रेल्वेची सुरक्षा अत्यंत तोकडी आहे. यापूर्वीही रेल्वेत साखळी बाॅम्बस्फोट होऊनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना झालेली नाही. याच गोष्टीचा फायदा उचलत कोणतंही हत्यार किंवा स्फोटकांचा वापर न करता दहशतवाद्यांनी  रेल्वे रूळ कमकुवत करून दुर्घटना घडवण्याचा दहशत वाद्यांचा कट असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणां यापूर्वीच प्राप्त झाली आहे.


अशी घडवू शकतात दुर्घटना?

उन्हाळ्यात लोखंड गरम होऊन ते किंचीत प्रसरण पावतं, तर हिवाळ्यात ते आकुंचन पावत असल्यानं रेल्वे रूळ एकमेकांना जोडताना त्यात इंचभर जागा सोडली जाते. याच इंचभर जागेत सिमेंट किंवा दगड टाकल्यास रूळ वाकडे होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असल्यानं घातपाताची ही नवी पद्धत दहशतवाद्यांनी शोधून काढली आहे. त्याचबरोबर रेल्वे रुळांवर कोणतीही गस्त नसते. त्यामुळे रूळाखाली स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवून मोठी दुर्घटना हे दहशतवादी घडवणार होते. तशी कबुली नुकत्याच एटीएसनं अटक केलेल्या फैजल मिर्झानं ही पोलिसांना दिली होती. नुकत्याच देण्यात आलेल्या धमकीमुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत.


हेही वाचा 

नायझेरियन तस्कर ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी

लाच घेणाऱ्या पोलिसांवर थेट ‘बडतर्फ’ची कारवाई



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा