Advertisement

'चीटर'नंतर 'सीनियर सिटीझन'कडे वळले अजय फणसेकर

आपल्या काही मोजक्याच भूमिकांमध्येही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असलेले लेखक-अभिनेते-दिग्दर्शक अजय फणसेकर सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. 'चीटर' या चित्रपटानंतर ते 'सिनियर सिटीझन' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

'चीटर'नंतर 'सीनियर सिटीझन'कडे वळले अजय फणसेकर
SHARES

आपल्या काही मोजक्याच भूमिकांमध्येही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असलेले लेखक-अभिनेते-दिग्दर्शक अजय फणसेकर सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. 'चीटर' या चित्रपटानंतर ते 'सिनियर सिटीझन' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.


डॅशिंग इन्स्पेक्टर

अजय फणसेकर हे नाव उच्चारताच आजही '१००' या मालिकेत त्यांनी साकारलेला डॅशिंग इन्स्पेक्टर डोळ्यांसमोर उभा राहतो. याशिवाय लेखक-अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या रूपात त्यांनी दिलेल्या काही आशयघन तसंच प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या चित्रपटांची आठवण होते. यात 'रात्र आरंभ', 'एनकाऊंटर', 'यही है जिंदगी', 'एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी' या चित्रपटांचा समावेश आहे. यात 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी' हा महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी त्यांनी केलेलं धाडस आणि घेतलेली मेहनत विसरता येत नाही. यापूर्वी वैभव तत्त्ववादीसोबत 'चीटर' बनवल्यानंतर फणसेकर आता पुन्हा एकदा एक नवा चित्रपट बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


शूटिंग लवकरच सुरू 

'सिनियर सिटीझन' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. ॐ क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचा विषय आणि त्यातील कलाकार या विषयींचा तपशील सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे. असं असलं तरी फणसेकरांनी आजवर नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला असल्यानं 'सिनियर सिटीझन' हे त्याच वाटेवरील पुढचं पाऊल असेल असं मानायला हरकत नाही. हा एक थ्रिलरपट असल्याचं सांगत आजवर कधीही न पाहिलेलं असं वेगळं कथानक या चित्रपटात पहायला मिळेल असं फणसेकर म्हणाले आहेत.



हेही वाचा - 
पुनरागमन करत झीनत साकारणार सकिना बेगम

घरोघरी पोहोचणार मुख्यमंत्र्यांची मिसेस!

'श्री गुरुदेव दत्त' म्हणत निशिगंधा वाड आणि दिपक देऊळकर यांचं पुनरागमन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा