Advertisement

झोंबिवलीचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’दिवशी होणार रिलीज

अमेय वाघचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘झोंबिवली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झोंबिवलीचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’दिवशी होणार रिलीज
SHARES

अमेय वाघचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘झोंबिवली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अचानक डोंबिवलीमध्ये आलेल्या झोंबी हल्ल्यानंतर काय घडते? याची थोडी थरारक थोडी विनोदी अशी कथा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डोंबिवलीमध्ये कशाप्रकारे झोंबींची एंट्री होते आणि मग हळूहळू बऱ्याच थरारक गोष्टी कशाप्रकारे घडत जातात हे, या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.


अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या झोंबिवली या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा झोंबी या संकल्पनेवर आधारित आहे.

हॉलिवूड चित्रपटात पाहिलेले झोंबी खरंच डोंबिवलीत आल्यावर काय होते या चित्रपटात विनोदी- थरारक अंदाजात हे दाखवण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.

हॉरर-कॉमेडी ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते आणि त्या हटके पोस्टरमुळे सर्वत्र चित्रपटाची चर्चा रंगली होती. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली होती.

हा चित्रपट यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून हा चित्रपट आता फेब्रुवारीच्या आधीच म्हणजे २६ जानेवारीला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेही वाचा

ऐश्वर्या रजनीकांत-धनुषचे लग्न मोडले, धनुष म्हणाला...

विनोदवीर कपील शर्मावर लवकरच बनणार बायोपिक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा