Advertisement

आनंद शिंदेंचं चाहत्यांसाठी सरप्राईज!


आनंद शिंदेंचं चाहत्यांसाठी सरप्राईज!
SHARES

‘जवा नवीन पोपट हा’ या गाण्यापासून ते अगदी ‘गणपती आला आणि नाचत गेला’ या गाण्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणारे, अगदी डान्ससाठी लाजणाऱ्या लोकांनाही आपल्या तालावर थिरकायला लावणारे गायक आनंद शिंदे यांच्याबद्दलची ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची आहे. गायक आनंद शिंदे लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. साई इंटरनॅशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तुत ‘नंदू नटवरे’ या सिनेमाचं दिग्दर्शन ते करत आहेत. आणि या चित्रपटात एक सरप्राईझही तुमच्यासाठी आहे.

‘नंदू नटवरे’ हा धम्माल विनोदी चित्रपट आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त जुहू येथील अजीवासन स्टुडिओमध्ये करण्यात आला. यावेळी सिनेमातील लोकगीतांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. हे लोकगीत खुद्द आनंद शिंदे यांनीच गायले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या त्यांच्या गाण्यांमध्ये आता या लोकगीताची देखील लवकरच भर पडणार आहे.



तुमच्यासाठी हे आहे सरप्राईझ!

आनंद शिंदे यांचे सुपुत्र डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच ते अभिनय क्षेत्रात पदापर्ण करत आहेत. तसेच, आदर्श आणि उत्कर्ष या शिंदेबंधूंचे संगीतदेखील या सिनेमातील गाण्यांना लाभणार असल्यामुळे शिंदेशाही समृद्धीचा सांगीतिक थाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा