'बबन'ची सक्सेसपार्टी


  • 'बबन'ची सक्सेसपार्टी
  • 'बबन'ची सक्सेसपार्टी
  • 'बबन'ची सक्सेसपार्टी
SHARE

'कस्संं?...बबन म्हणेन तसं' आणि 'हम खडे तो साला सरकार से भी बडे' हा बबनचा डायलॉग असो वा सिनेमातील खलनायक विक्रमदादाचा 'म्हणजे आम्ही येडे' हा संवाद असो, आजही 'बबन' हा सिनेमा महाराष्ट्राच्या अनेक सिनेमागृहात प्रेक्षक आवडीने पाहता आहेत. ग्रामीण तरुणावर आधारित असलेल्या या सिनेमाला पश्चिम महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.


बबनची सक्सेसपार्टी

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित बबन या सिनेमाने सुपरहिट ५० दिवस पूर्ण केल्याने, या घवघवीत यशाची सक्सेसपार्टी मुंबईत साजरी झाली. या सक्सेसपार्टीत 'बबन' सिनेमातील सर्व स्टारकास्ट आणि युनिट मेम्बर्सचा सत्कार करण्यात आला.सिनेमाने केली इतकी कमाई

'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. त्यादिवसांपासून आजतागायत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ कोटींची कमाई केली आहे.
ख्वाडा फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव या सिनेमातल्या प्रमुख कलाकारांच्या कामगिरीचेदेखील सर्वत्र विशेष कौतुक केलं जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या