Advertisement

'जाणता राजा' जगभर पोहोचणार, 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' डाॅक्युमेंटरी स्वरूपात

छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या तेजाने महाराष्ट्र झळाळून गेला असला, तरी महाराजांच्या किर्तीची दखल जागतिक पातळीवर म्हणावी तशी घेण्यात आलेली नाही. मात्र ही कमतरता भरून काढण्यासाठी 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डाॅ. हेमंत गायकवाड पुढे सरसावले आहेत. याच पुस्तकावर आधारीत डाॅक्युमेंटरी तयार करून ते जगभरात विविध भाषांमध्ये महाराजांची किर्ती पोहोचवणार आहेत.

'जाणता राजा' जगभर पोहोचणार, 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' डाॅक्युमेंटरी स्वरूपात
SHARES

'स्वराज्य हाच आपला स्वधर्म' हे अग्नितत्व जनमानसात रुजवणारा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्वदेशकार्यात एकत्र आणण्यासाठी त्यांच्यात स्फूल्लिंग चेतवणारा, महाराष्ट्र भूमीत जन्मलेला एकमेव 'जाणता राजा' म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या तेजाने महाराष्ट्र झळाळून गेला असला, तरी महाराजांच्या किर्तीची दखल जागतिक पातळीवर म्हणावी तशी घेण्यात आलेली नाही. मात्र ही कमतरता भरून काढण्यासाठी 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डाॅ. हेमंत गायकवाड पुढे सरसावले आहेत. याच पुस्तकावर आधारीत डाॅक्युमेंटरी तयार करून ते जगभरात विविध भाषांमध्ये महाराजांची किर्ती पोहोचवणार आहेत.




जागतिक योद्ध्यांसोबत तुलना

शिवाजी महाराज यांची जगभरातील निवडक योद्ध्यांशी तुलना करून शिवाजी महाराज त्यांच्या तुलनेत कसे 'ग्रेटेस्ट' आहेत, हे डाॅ. गायकवाड यांनी आपल्या 'द ग्रेट शिवाजी महाराज' या पुस्तकातून सप्रमाण दाखवून दिलं आहे. याच पुस्तकावर आधारीत डाॅक्युमेंटरी डॉ. गायकवाड घेऊन येत आहे. सध्या हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तीन भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी प्रेक्षकांना बघता येणार आहे.



म्हणून डाॅक्युमेंटरी महत्त्वाची

अनेक वेळा आपण पुस्तक वाचण्याचा कंटाळा करतो. किंवा पुस्तक वाचताना आपल्याला प्रत्येक घटना मनातल्या मनात उभी करावी लागते. पुस्तकातील अनेक व्यक्ती आपल्यासाठी नवीन असतात. त्यामुळे त्यांचं चित्र डोळ्यासमोर उभं करणं कठीण जातं. मात्र डॉक्युमेंटरी बघीतल्यावर इतिहासातील घटना, व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षात दिसतात.



प्रत्येक शाळेत जाणार

या डॉक्युमेंटरची खरी गरज शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. शिवाजी महाराज यांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा, यासाठी राज्य शासनामार्फत प्रत्येक शाळांमध्ये ही डॉक्युमेंटरी घेऊन जाणार आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देश-विदेशात त्या त्या भाषेत ही डॉक्युमेंटरी पोहोचवणार आहे. जेणेकरून संपूर्ण जगाला शिवाजी महाराजांचा इतिहास ज्ञात होईल, असं डाॅ. हेमंत गायकवाड यांनी सांगितलं.



हेही वाचा-

महाराजांच्या जीवनावर आधारीत पहिला अॅनिमेशनपट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा