Advertisement

सिद्धार्थ म्हणतो, मला शेफ व्हायचं होतं!


सिद्धार्थ म्हणतो, मला शेफ व्हायचं होतं!
SHARES

'सिनेसृष्टीत येण्यापूर्वी मला शेफ व्हायचं होतं', अशी इच्छा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने बोलून दाखवली आहे. त्याचा बहुचर्चित 'गुलाबजाम' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थने आयटीएम इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या 'एलिमेंट 2018' या खाद्य स्पर्धेत हजेरी लावली. यावेळी त्या विद्यार्थ्यांनी 'गुलाबजाम' याच संकल्पनेंतर्गत ७५ वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजाम तयार केले होते. ज्याचा आस्वाद घेत सिद्धार्थने विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. शिवाय 'आपल्यालाही शेफ व्हायचं होतं', अशी इच्छाही विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवली.


सिद्धार्थसाठी गुलाबजामचे ७५ प्रकार

'एलिमेंट 2018' या स्पर्धेत भाग घेतलेल्या या विद्यार्थ्यांनी यावेळी पुरणपोळी गुलाबजाम, रम गुलाबजाम, गुलकंद गुलाबजाम, मिंट आणि चणाडाळ गुलाबजाम पासून ते मटण हलवा गुलाबजाम यांसारखे गुलाबजामचे ७५ वेगवेगळे प्रकार तयार केले होते. त्याचा आस्वाद सिद्धार्थने घेतला.


काय म्हणाला सिद्धार्थ?

'अशा प्रकारचा अफलातून प्रकार मी याआधी कधीच पहिला नाही. आपल्या चौकटीबाहेर जाऊन असा आगळावेगळा प्रयोग करणे ही नेहमीच कौतुकाची बाब असते आणि मला खरंच या मुलांचं कौतुक करावंसं वाटत, ज्यांनी एवढी मेहनत घेत आमच्यासाठी हे खास गुलाबजाम बनवले, असं यावेळी सिद्धार्थ चांदेकर म्हणाला. शिवाय मलाही चहा उत्तम बनवता येतो, सिनेसृष्टीत पदापर्ण करण्याआधी मलाही शेफ होण्याची इच्छा होती, असे सिद्धार्थने सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या प्रयोगामुळे खाद्यवेड्या सिद्धार्थला गुलाबजामची ही 'ट्रीट' एक वेगळा अनुभव देऊन गेली हे नक्की!



हेही वाचा

चवीसारखाच मनात रेंगाळणारा...गुलाबजाम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा