Advertisement

गंभीर विषय विनोदी अंगाने मांडणारा 'जगावेगळी अंतयात्रा'!


गंभीर विषय विनोदी अंगाने मांडणारा 'जगावेगळी अंतयात्रा'!
SHARES

गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटात सातत्याने नवनवीन प्रयोग होताना दिसत आहे. त्यातच नाविन्यपूर्ण विषयाला हात घालणारा चित्रपट म्हणजे 'जगावेगळी अंतयात्रा'!


दिग्गज कलावंतांची साथ

अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा. लि. बॅनर खाली डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल निर्मित आणि अमोल लहांडे दिग्दर्शित 'जगावेगळी अंतयात्रा' या चित्रपटात भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे या दिग्गज कलावंताबरोबरच सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे आणि शिवानी भोसले या नवोदित कलावंतांचाही समावेश आहे.


चित्रपटाची कथा

नोकरी हा आजच्या तरुण पिढीसमोर भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे. त्यात उच्च शिक्षित तरुणांपुढे जर हा विषय आला, तर त्या अडचणींना ते कशा पद्धतीने सामोरे जातात? आणि त्यांच्या कर्तृत्वाने ते इतरांपुढे काय आदर्श घालून देतात? हा गंभीर विषय अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला आहे. हसता हसता एका महत्त्वाच्या समस्येबाबत विचार करायला प्रवृत्त करणारा हा सिनेमा असल्याचं दिग्दर्शक अमोल लहांडे यांनी सांगितलं.

येत्या २३ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

क्रिकेटवेड्या तरुणाईचं भावविश्व मांडणारा 'मी पण सचिन'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा