Advertisement

‘वय विचारू नका’ म्हणत सोनाली बनली ‘माधुरी’

स्वप्ना यांनी या चित्रपटाचाही टीझर आपल्या नेहमीच्याच चकचकीत शैलीत बनवला आहे. एका हॅालमध्ये गिटार वाजवत बसलेली एक तरुणी या टीझरमध्ये सुरुवातीला दिसते.

‘वय विचारू नका’ म्हणत सोनाली बनली ‘माधुरी’
SHARES

‘लाखों दिलों की धडकन’ असं जिचं वर्णन केलं जातं त्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे आजही जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यामुळे माधुरी म्हटलं की, सर्वप्रथम दीक्षितांकडून नेनेंच्या घरी गेलेल्या माधुरीचीच अनाहुतपणे आठवण येते. लवकरच रुपेरी पडद्यावरही एक नवीन माधुरी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. आपल्या ‘सो कूल’ अभिनयाने प्रेक्षकांवर ‘मोहिनी’ घालणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता माधुरीच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.



मिश्किल टॅगलाईन

होय, ही बातमी शंभर टक्के खरी आहे. सोनाली कुलकर्णीच माधुरी बनली आहे. पण ही ती माधुरी नक्कीच नाही. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटानंतर स्वप्ना वाघमारे जोशी आपल्या आगामी चित्रपटाकडे वळल्या आहेत. या चित्रपटाला त्यांनी ‘माधुरी’ असं लक्षवेधी शीर्षक दिलं आहे. त्या जोडीला ‘वय विचारू नका!’ अशी काहीशी मिश्किल टॅगलाईनही देण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला आहे.

कोण बरं ही?

स्वप्ना यांनी या चित्रपटाचाही टीझर आपल्या नेहमीच्याच चकचकीत शैलीत बनवला आहे. एका हॅालमध्ये गिटार वाजवत बसलेली एक तरुणी या टीझरमध्ये सुरुवातीला दिसते. पिवळ्या रंगांच्या दिव्यांच्या झगमगाटात सुरुवातीला कॅमेरा जेव्हा तिच्या गिटार वाजवत असलेल्या हातांवर फिरतो तेव्हा ‘कोण बरं असावी ही?’ असा प्रश्न क्षणार्धात मनात येऊन जातो न जातो इतक्यात परफॅार्मंस आर्टिस्टसारखे कपडे, डोळ्यांना गॅागल, मोकळे सोडलेले केस या स्वरूपात सोनालीचा चेहरा दिसतो.


३० नोव्हेंबरला प्रदर्शित

सोनालीची हलकीशी झलक दाखवल्यानंतर लगेच चित्रपटाचं शीर्षक येतं आणि न राहावून ही खरंच सोनालीच होती ना? असा विचार मनात चमकून जातो आणि पुन्हा एकदा ‘माधुरी’चा टीझर पाहिला जातो. हेच या टीझरचं यश आहे. मुंबापुरी प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट ३० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मोहसीन अख्तर या चित्रपटाचे निर्माते आहे. टीझर पाहिल्यावर या चित्रपटाचा संबंध माधुरी दीक्षितशी नसल्याची जाणीव होते, पण ती माधुरी नाही, तर मग ही कोणती माधुरी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही वाढते.



हेही वाचा -

नागराज-झी चा नवीन चित्रपट ‘नाळ’

'एक सांगायचंय...' म्हणत प्रथमच एकत्र आले केके-राजेश्वरी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा