Advertisement

महेश मांजरेकरांनी साधली दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया

‘न्यायदेवता आंधळी असते...आम्ही डोळस होतो’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये पाच दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे.

महेश मांजरेकरांनी साधली दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया
SHARES

हिंदीपासून मराठीपर्यंत नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या विषयावरील सिनेमे बनवणाऱ्या निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांनी कायम बड्या कलाकारांसोबत सिनेमे केले आहेत. ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी मराठी सिनेमाही याला अपवाद नाही. या सिनेमात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर हे दिग्गज एकत्र दिसणार आहेत.


१८ ऑक्टोबरला प्रदर्शित

‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘न्यायदेवता आंधळी असते...आम्ही डोळस होतो’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये पाच दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे.


विनोदी अभियनाचा बादशहा 

विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सतीश आळेकर हे नाव एकांकिकांपासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत आणि छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यार्पंत विविध पातळीवर गाजलेलं आहे. अशोक सराफ हे केवळ नावच खूप आहे. विनोदी अभियनाचा बादशहा असं बिरुद मिरवणाऱ्या सराफ यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळे छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अबालवृद्धांना मोहिनी घालण्याचं कसब शिवाजी साटम यांच्याकडे आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य दिलीप प्रभावळकरांच्या ठायी आहे.


गहन विषय 

अशा सर्व दिग्गजांना एकाच फ्रेममध्ये आणण्याचं काम दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी ‘मी शिवाजी पार्क’च्या माध्यमातून केलं आहे. या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस आदी कलाकारही यात दिसणार आहेत. सिनेमाचं शीर्षक आणि टॅगलाईन पाहता ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये काहीतरी गहन विषय मांडण्यात आल्याची चाहूल नक्कीच लागते. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.



हेही वाचा -

अमेरिकेतील मराठमोळ्या इंजिनीअरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री

नाजुकावर ‘प्रीती सुमने’ उधळणार सुबोध




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा