Advertisement

सुमेध मुद्गलकरचा हॉट अवतार!


सुमेध मुद्गलकरचा हॉट अवतार!
SHARES

आकर्षक पिळदार शरीरयष्टी, स्टायलिश अंदाज हे सर्व आपण आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील नायकांमध्ये बघितलं असेल. पण यात मराठी नायकही काही मागे नाहीत. अभिनयाबरोबरच ते आपल्या शरीरयष्टी आणि लुकवरही मेहनत घेताना दिसत आहेत. यात एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घ्यायला हवं, तो म्हणजे सुमेध मुद्गलकर.

सुमेधचे फॅन त्याच्यावर भलतेच खूष आहेत. कारण, नुकतंच त्याने जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे हे वर्कआऊटचे फोटो पाहून चाहते त्याच्यावर भलतेच फिदा झाले आहेत. सुमेधचा हा नववर्षाचा फिटनेट फंडा चाहत्यांना फारच आवडला आहे.



हे चित्रपट ठरले खास

सुमेधने आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'मांजा', 'व्हेंटिलेटर' या सुमेधच्या चित्रपटांचं प्रेक्षकांनी चांगलंच कौतुक केलं. तसेच, 'डान्स महाराष्ट्र डान्स’, 'डान्स इंडिया डान्स सीझन ४' या रिअॅलिटी शोमधून सुमेध एक उत्तम डान्सर म्हणून प्रेक्षकांसमोर आला.


बकेट लिस्टमधून पुन्हा येणार प्रेक्षकांसमोर

काही दिवसांपूर्वी सुमेधने धकधक गर्ल माधुरी दीक्षितबरोबर एक फोटो शेअर केला होता. सुमेध माधुरीबरोबर 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. 'हम आपके है कौन' या सिनेमानंतर माधुरी आणि रेणुका शहाणे २३ वर्षांनंतर 'बकेट लिस्ट'मध्ये एकत्र काम करताना दिसतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा