Advertisement

स्वप्निलच्या नव्या लुकचा ‘मोगरा फुलला’

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या स्वप्निल जोशीनंही नेहमीच व्यक्तिरेखेला साजेसा गेटअप करत अभिनय केला आहे. ‘मोगरा फुलला’ या आगामी मराठी सिनेमात प्रेक्षकांना स्वप्निलचा काहीसा असा लुक पाहायला मिळणार आहे.

स्वप्निलच्या नव्या लुकचा ‘मोगरा फुलला’
SHARES

कलाकारांना नेहमीच सिनेमाची कथा आणि व्यक्तिरेखेनुसार आपला लुक बदलावा लागतो. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या स्वप्निल जोशीनंही नेहमीच व्यक्तिरेखेला साजेसा गेटअप करत अभिनय केला आहे. ‘मोगरा फुलला’ या आगामी मराठी सिनेमात प्रेक्षकांना स्वप्निलचा काहीसा असा लुक पाहायला मिळणार आहे.


सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज

मागील काही दिवसांपासून एका मागोमाग एक स्वप्निलचे महत्त्वपूर्ण सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ नंतर स्वप्निलचा ‘सचिन’ प्रदर्शित झाला. आता ‘मोगरा फुलला’ हा त्याचा आगामी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी केलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर प्रदर्शित होणारा श्रावणी यांचा हा पहिला सिनेमा आहे.सिनेमाबाबत कुतूहल

आजवर बऱ्याचदा चाकलेट हिरोची भूमिका साकारणाऱ्या स्वप्निलचा ‘मोगरा फुलला’मधील लुक नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिव्हील करयात आला आहे. या सिनेमात स्वप्निलनं सुनील कुलकर्णी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. स्वप्निलच्या या नव्या अवतारामुळं चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ‘लपंडाव’, ‘सरकारनामा’, ‘लेकरू’ हे गाजलेले मराठी सिनेमे करणाऱ्या श्रावणी देवधर बऱ्याच काळानंतर पुन्हा दिग्दर्शनाकडे वळल्यानंही या सिनेमाबद्दल कुतूहल आहे.


परस्परभिन्न व्यक्तिरेखांची प्रेमकहाणी

‘फुगे’, ‘तुला कळणार नाही’, ‘रणांगण’ या चित्रपटांची निर्मिती आणि ‘भिकारी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या ‘जीसिम्स’ने ‘मोगरा फुलला’ची निर्मिती केली आहे. या सिनेमात एक प्रेमकथा पाहायला मिळेल याची चाहून शीर्षकावरून लागते. त्यानुसार या सिनेमात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुनील कुलकर्णीची कथा आहे. लग्नाचं वय उलटून गेलं तरी हा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला आहे. अचानक एक दिवस आपण प्रेमात पडल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो जिच्या प्रेमात पडतो ती एक सुखवस्तू कुटुंबातील, पण स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची तरुणी आहे. त्यामुळं या दोन परस्परभिन्न व्यक्तिरेखांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना आकर्षित करणारी ठरू शकते.हेही वाचा -

EXCLUSIVE : ‘फरफ्युम’मध्ये ‘महेक’णार लोणावळयाची मोना!

जमली रे जमली सोनाक्षी-नवाजची जोडीसंबंधित विषय
Advertisement