Advertisement

राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड म्हणजे 'चंद्रमुखी'

विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे.

राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड म्हणजे 'चंद्रमुखी'
SHARES

आपल्या रुपानं आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं आहे. त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी’ ही राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे.

प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांभाळली आहे. लेखकाचं मनोगत पडद्यावर मांडण्याचं प्रसाद ओक यांचं कौशल्य अनेकांनी त्यांच्या ‘हिरकणी’ या सिनेमात अनुभवलं आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमाचं पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेलं आहे. ‘हिरकणी’ची लेखक-दिग्दर्शक जोडी ‘चंद्रमुखी’साठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.



हेही वाचा

'मुंबई सागा'तील जॉन अब्राहमचा पहिला लुक रिलीज

७ वर्षांनंतर ऋषी आणि नितू कपूर 'या' चित्रपटातून करणार कमबॅक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा