Advertisement

उत्सुकता सचिन दरेकरांच्या 'पार्टी' ची!


उत्सुकता सचिन दरेकरांच्या 'पार्टी' ची!
SHARES

आपल्या लेखणीतून ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारखे चित्रपट कागदावर उतरवणारे कथा-पटकथालेखक सचिन दरेकर आता दिग्दर्शकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या सिनेमाचं शीर्षक ‘पार्टी’ असं आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल. नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर या सिनेमाचं टीझर पोस्टर लाँच करण्यात आलं.


पार्टी पाच मित्रांची

नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांनी ‘पार्टी’ची निर्मिती केली आहे. या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे टीझर पोस्टरवर लपवण्यात आले आहेत. त्यामुळे या सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरवरून तरी ही पार्टी पाच तरुण मित्रांची असल्याचं जाणवतं.


गुरू ठाकूरांचं गीतलेखन

‘पार्टी’ची कथा, पटकथा आणि संवाद सचिन दरेकरांनी प्रशांत लोके यांच्या साथीने लिहिले आहेत. गीतकार गुरू ठाकूरने या सिनेमासाठी गीतलेखन केलं असून संगीत अमितराजने दिलं आहे. अमितराजनेच अविनाश लोहारसोबत या सिनेमाला पार्श्वसंगीतही दिलं आहे. राज साटणकर यांचं छायालेखन आणि फैसल-इम्रान यांचं संकलन या सिनेमाला लाभलं आहे.



हेही वाचा -

कॉम्रेड अजित अभ्यंकर रुपेरी पडद्यावर

समाजातील वास्तव मार्मिकपणे मांडणार ‘फांदी’


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा