Advertisement

'असेही एकदा व्हावे'च्या पारड्यात सहा नामांकन

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होत असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'असेही एकदा व्हावे' हा सुश्रुत भागवत दिग्दर्शित सिनेमा अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

'असेही एकदा व्हावे'च्या पारड्यात सहा नामांकन
SHARES

दर्जेदार कथानक आणि उत्कृष्ट दिग्दर्शनातून साकार झालेल्या कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाला एकूण ६ नामांकन मिळाली आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होत असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'असेही एकदा व्हावे' हा सुश्रुत भागवत दिग्दर्शित सिनेमा अंतिम फेरीत दाखल झाला आहे.



या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले असून, अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचं नामांकन मिळालं आहे. शिवाय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शर्वाणी पिल्लई, सर्वोत्कृष्ट गीतकार वैभव जोशी आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका सावनी शेंडे यांनादेखील नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत.

६ एप्रिलला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात उमेश तेजश्रीबरोबर शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड, अजित भुरे आणि नारायण जाधव या कलाकारांच्या भूमिका आहेत.


हेही वाचा

'असेही एकादा व्हावे'साठी उमेश-तेजश्रीने घेतले अभिनयाचे धडे!

तेजश्री प्रधान झाली मराठीतली विद्या बालन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा