Advertisement

सेन्सॉरमुळे 'बबन'चा मुहूर्त टळला!


सेन्सॉरमुळे 'बबन'चा मुहूर्त टळला!
SHARES

भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला आहे. हा सिनेमा येत्या २९ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या नवीन नियमांचा फटका 'बबन' या चित्रपटाला बसला आहे. त्यामुळे 'बबन'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली असताना त्याचा मुहूर्त टळला आहे. आता हा सिनेमा २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.


काय आहे सेन्सॉरचा नियम?

सेन्सॉर बोर्डाच्या नियमानुसार सेन्सॉरचं प्रमाणपत्र देण्यासाठी ६८ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पण 'बबन' या सिनेमाला सेन्सॉरचं प्रमाणपत्रच मिळालेलं नाही. त्यामुळे 'बबन' या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.


सिनेमाची कथा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि 'ख्वाडा' या चित्रपटाचे दिग्दर्शक नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' या सिनेमात शेतकरी कुटुंबातल्या महाविद्यालयीन युवकाची हळुवार फुलणारी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. या सिनेमात ५ गाणी वेगवेगळ्या धाटणीची आहेत. सध्या यातील 'साज हो तुझा'.. आणि 'मोहराच्या दारावर'.. या २ गाण्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव यांच्यासह शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, अभय चव्हाण, सीमा समर्थ, चंद्रकांत राऊत यांच्या भूमिका आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा