Advertisement

बॉक्स ऑफिसवर ‘दशक्रिया’ सुपरहिट, लवकरच जगभरात होणार प्रदर्शित!


बॉक्स ऑफिसवर ‘दशक्रिया’ सुपरहिट, लवकरच जगभरात होणार प्रदर्शित!
SHARES

काही सिनेमांची चर्चा ते प्रदर्शित होण्याआधीच बरीच झालेली असते. कधी चांगली तर कधी वाईट. हल्ली बरेच सिनेमे प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात आणि मग प्रदर्शित झाल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळणार? यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. यातलाच एक सिनेमा म्हणजे 'दशक्रिया'. दशक्रिया या सिनेमाविरुद्ध ब्राह्मण समाजातून विरोध दर्शवला गेला होता. त्यामुळे या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रीय व ११ राज्य पारितोषिक विजेत्या 'दशक्रिया' या बहुचर्चित चित्रपटाने महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये घसघशीत यश मिळवीत बॉक्स ऑफिसवर ‘हाउस फुल्ल’ कलेक्शन करीत सुपरहिटचा मान पटकावला आहे. दुसऱ्या आठवड्यात 'दशक्रिया'ची यशस्वी घोडदौड दुप्पट वेगात सुरु आहे.'दशक्रिया' १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु, वेगवेगळ्या वादविवादांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणचे खेळ पहिल्या दिवशी शुक्रवारी बंद ठेवण्यात आले होते. परंतु नंतर चित्रपटाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत शनिवार, रविवारचे जवळपास ३५० हून अधिक खेळ ९५ टक्के प्रतिसाद देऊन ‘हाउसफुल’ केले.'दशक्रिया'चे दुसऱ्या आठवड्यात पदार्पण झाले असून संपर्ण महाराष्ट्रात दररोज २०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरु आहे. सर्वत्र चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत होत असून 'दशक्रिया'ला आता कुठेही विरोध होत नाही. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अाशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, तसेच पदार्पण करणारे बालकलाकार आर्या आढाव, विनायक घाडीगावकर यांच्यासह जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून विनोदी अभिनेते आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या राज्य पुरस्कार विजेत्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. नवी उमेद घेऊन पदार्पणात राष्ट्रीय पुरस्कारावर शिक्का मारणाऱ्या दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.हेही वाचा

एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये 'दशक्रिया'ची निवड!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा