Advertisement

सई झाली भावूक, सेलिब्रेशन ‘दुनियादारी’च्या पाचव्या वर्षपूर्तीचं…

‘दुनियादारी’ हा सिनेमा रिलीज होताच शिरीन, श्रेयस (बच्चू), दिगंबर (दिग्या), मिनाक्षी (मीनू), साईनाथ (साई) या सिनेमातील मित्रांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. ‘दुनियादारी’ने मराठी चित्रपटांची परिभाषा बदलली. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करणाऱ्या या सिनेमाने नुकतीच ५ वर्ष पूर्ण केली आहेत.

सई झाली भावूक, सेलिब्रेशन ‘दुनियादारी’च्या पाचव्या वर्षपूर्तीचं…
SHARES

१९ जुलै २०१३ रोजी रिलीज झालेल्या संजय जाधवच्या ‘दुनियादारी’ या सिनेमाचं यश सर्व कलाकार-तंत्रज्ञांनी एकत्र येऊन साजरं केलं. यावेळी सई ताम्हणकर भावूक झाली.

विक्रमी कलेक्शन

‘दुनियादारी’ हा सिनेमा रिलीज होताच शिरीन, श्रेयस (बच्चू), दिगंबर (दिग्या), मिनाक्षी (मीनू), साईनाथ (साई) या सिनेमातील मित्रांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. ‘दुनियादारी’ने मराठी चित्रपटांची परिभाषा बदलली. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करणाऱ्या या सिनेमाने नुकतीच ५ वर्ष पूर्ण केली आहेत.

टीम एकत्र

या निमित्ताने ‘दुनियादारी’ सिनेमाच्या टीमने एकत्र येऊन सेलिब्रेशन केलं. सिनेमाचे प्रस्तुतकर्ते नानुभाई जयसिंघानी, दिग्दर्शक संजय जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सुशांत शेलार, म्युझिक दिग्दर्शक पंकज पडघन, अमितराज, रोहित राऊत, दिपक राणे यांनी केक कापून सेलिब्रेशन केलं.

सई झाली भावूक

सेलिब्रेशन प्रसंगी सई खूपच भावूक झाली होती. आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणाली की, मला आठवतंय, ५ वर्षांपूर्वी याचवेळी सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड लागले होते. हा सिनेमा माझ्यासाठी अत्यंत स्पेशल आहे. दुनियादारीमुळे आम्हा सर्वच कलाकारांची आयुष्यं बदलली. ‘दुनियादारी’ने मला फक्त पैसा आणि प्रसिध्दीच नाही दिली, तर आयुष्यभरासाठी साथ देतील अशी जीवाभावाची माणसं दिली.

लकी सिनेमा

याप्रसंगी संजयनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, हा चित्रपट बनवताना तो प्रेक्षकांना आवडेल असा आम्हाला विश्वास होता. पण दुनियादारी सिनेमा मराठी सिनेसृष्टीतले त्याअगोदरचे सर्व रेकॉर्ड तोडेल, असं वाटलं नव्हतं. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या या प्रेमाचं उतराई होणं अशक्यच आहे. असंच प्रेम यंदा रिलीज होणाऱ्या आमच्या ‘लकी’ सिनेमालाही मिळावं, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा-

‘बाहुबली २’ मधील कुमार वर्माच्या आवाजात बोलणार ‘ड्रॅक्युला’

माझ्यापेक्षा विरूद्ध स्वभावाचे घाणेकर साकारणं कठीण- सुबोध भावे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा