एकदा या 'गच्ची'वर फेरफटका माराच!

गच्चीचे वेगळेपण सांगणारा 'गच्ची' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

 Mumbai
एकदा या 'गच्ची'वर फेरफटका माराच!

आपल्या आयुष्यात अशी एखादी जागा असते, त्या जागेचे महत्त्व आपल्यासाठी खूप जास्त असते. अशा आपल्या फेव्हरेट जागांमध्ये तिला विसरून चालतच नाही. तिचा अवर्जून उल्लेख केला जातो. ती म्हणजे सगळ्यांची लाडकी गच्ची! ही गच्ची प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आठवणी घेऊन येते. गच्चीचे हेच वेगळेपण सांगणारा 'गच्ची' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

गच्ची या चित्रपटात प्रिया बापट आणि अभय महाजन प्रमुख भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्येच आपल्याला चित्रपटासाठी गच्ची किती महत्त्वाची आहे? हे कळतं. प्रियाचा अफलातून अभिनय आणि तिला नचिकेतची उत्तम साथ ही केमिस्ट्री या गच्चीत जुळून आली आहे.नचिकेत सामंत दिग्दर्शित हा चित्रपट २२ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे २२ डिसेंबरपासून प्रेक्षकांना मस्तपैकी गच्चीत फेरफटका मारता येणार आहे.हेही वाचा

नम्रता गायकवाडच्या या लूकमागे दडलंय काय?


Loading Comments