Advertisement

'रेडू'च्या खात्यात आणखी ९ नामांकनं!

श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा पुरस्कार जाहीर झाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी शशांक शेंडे आणि छाया कदम, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी गुरू ठाकूर, सर्वोत्कृष्ट संगीत आणि पार्श्वसंगीतासाठी विजय नारायण गवंडे, सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेसाठी संजय नवगिरे यांना नामांकन मिळालं आहे.

'रेडू'च्या खात्यात आणखी ९ नामांकनं!
SHARES

मानाचा अरविंदन पुरस्कार मिळवलेला 'रेडू' हा चित्रपट राज्य पुरस्कारांमध्येही चमकला आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह रेडूला एकूण ९ नामांकनं मिळाली आहेत. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कारांची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली.



हे नऊ पुरस्कार जाहीर

श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा पुरस्कार जाहीर झाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी शशांक शेंडे आणि छाया कदम, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी गुरू ठाकूर, सर्वोत्कृष्ट संगीत आणि पार्श्वसंगीतासाठी विजय नारायण गवंडे, सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेसाठी संजय नवगिरे यांना नामांकन मिळालं आहे.



राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रेडूची दखल घेण्यात आली आहे. आता राज्य पुरस्कारांमध्ये मिळालेल्या ९ नामांकनांनी चित्रपटाचा गौरव झाला आहे. माझ्या पहिल्याच प्रयत्नाचं होत असलेलं कौतुक प्रचंड आत्मविश्वास वाढवणारं आहे.

सागर वंजारी,  दिग्दर्शक


या पूर्वी प्रतिष्ठेच्या 'कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'तील इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विभागात 'रेडूची' निवड झाली होती. या विभागात निवड झालेला 'रेडू' हा एकमेव भारतीय चित्रपट होता. कोलकाता महोत्सवात इंडियन कॉम्पिटिशन विभागासाठी रेडूची निवड झाली होती. त्या स्पर्धेत 'रेडू' हा एकमेव मराठी चित्रपट होता. तसंच  'इफ्फी'सारख्या महत्त्वाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातही त्याची निवड झाली होती. केरळच्या चलत् चित्र अकादमीतर्फे दिग्दर्शक सागर वंजारी यांना पदार्पणाच्या चित्रपटासाठी मानाच्या अरविंदन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.



हेही वाचा

कान्समध्ये झळकणार 'हे' तीन मराठी चित्रपट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा