मास्क मॅन आणि घाबरलेली सोनाली, 'विक्की वेलिंगकर'चा टीझर प्रदर्शित

हातात बंदुक घेऊन उभा असलेला मास्क मॅन आणि जीवाच्या आकांतानं पळणारी सोनाली कुलकर्णी यांना दाखवत 'विक्की वेलिंगकर'च्या टीझरची सुरुवात होते.

SHARE

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचा आगामी सिनेमा 'विक्की वेलिंगकर' (Vicky Velingkar) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी स्वतः या सिनेमाचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे

मास्क मॅन कोण?

हातात बंदुक घेऊन उभा असलेला मास्क मॅन आणि जीवाच्या आकांतानं पळणारी सोनाली कुलकर्णी यांना दाखवत 'विक्की वेलिंगकर'च्या टीझरची सुरुवात होते. टीझर मध्ये 'लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस' असं म्हणत सोनाली पूर्णतः बिनधास्त अंदाजात दिसून येत आहे. तर "ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,” हा प्रश्न टीझरमधून समोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट रहस्यमय कथानकावर आधारीत असल्याचं कळून येतं. विक्की वेलिंगकर चित्रपटाच्या टीझरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अनपेक्षित अशी गूढकथा

विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गुढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे' असं चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ शर्मा यांनी सांगितलं.

कधी प्रदर्शित होणार

सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा

कधी काळी राणा दा होता बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता सर्वांना 'घाबरवणार'


संबंधित विषय
ताज्या बातम्या