Advertisement

‘अश्विनी…’ची जादू अन् ‘पैशांचा पाऊस’

‘ये रे ये रे पैसा २’चा संगीत प्रकाशन सोहळा

SHARES

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटातलं 'अश्विनी ये ना…' हे गाणं आजही खूप पाप्युलर आहे. आता जवळपास ३२ वर्षांनी हेच गाणं ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटात नव्या रंगात, नव्या ढंगात अनुभवायला मिळणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चारुशीला साबळे, सचिन पिळगांवकर यांच्या उपस्थितीत 'अश्विनी ये ना…' या धमाकेदार गाण्यासोबत ‘ये रे ये रे पैसा २’मधील आणखी दोन गाणी लाँच करण्यात आली. या प्रसंगी संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आदी कलाकारही उपस्थित होते. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे. ट्रॉय-आरिफ या जोडीनं या चित्रपटाला संगीत आणि पार्श्वसंगीत दिलं आहे.हेही वाचा -

खुशखबर! मुंबईत शनिवारपासून पाणीकपात नाही

काय रे, अलिबागवरून आलायस का? डायलाॅगवरील बंदीची याचिका फेटाळलीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा