Advertisement

रितेश, नागराज आणि अजय-अतुल साकारणार महाराजांची महागाथा

शिवजयंतीनिमित्त या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शन-निर्माता नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचा एक टिझर ट्विट केला आहे,.

रितेश, नागराज आणि अजय-अतुल साकारणार महाराजांची महागाथा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिवजयंतीनिमित्त या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शन-निर्माता नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचा एक टिझर ट्विट केला आहे,.

मागच्या अनेक वर्षांपासून अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. रितेश आणि जेनेलियाला अजय-अतुल यांची साथ मिळाली आहे.

नागराज मंजुळेंनी हा टीझर ट्विट करताना त्याला एक कॅप्शन दिलं आहे. त्यानुसार, "एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित…आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीनं घेऊन येतोय शिवत्रयी… शिवाजी…राजा शिवाजी…छत्रपती शिवाजी…शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा", असं म्हणत नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे. या जिझरमध्ये चित्रपट प्रदर्शनाची तारीख दिली नाही. पण २०२१ मध्ये हा चित्रपट येणार आहे हे टिझरमध्ये देण्यात आलं आहे. 

नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. या चित्रपटाने आजपर्यंतच़े सर्व विक्रम मोडीत काढत 110 कोटींची कमाई केली होती. या सिनेमातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोन नवखे चेहरे मराठी सिनेसृष्टीला नागराज मंजुळेंनी दिले. आता त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट देखील येत आहे. झुंड असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन काम करत आहेत. त्यांच्यासोबत विक्रम गोखले देखील पाहायला मिळत आहेतहेही वाचा

मुंबईचे 'गली बॉईज', जिंकलं 'अमेरिका गॉट टॅलेंट'

नात्यांचा शोध घेणारी ‘सहकुटुंब सहपरिवार’

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा