Advertisement

'रणांगण'मधलं गुरू ठाकूरचं नवीन गाणं!

गणेशभक्तांच्या भावना व्यक्त करणारे या गाण्यातले शब्द लिहिले आहेत गुरू ठाकूर यांनी, तर शशांक पोवार यांनी संगीत दिलं आहे. वैशाली माडेच्या आवाजात म्हटलेलं हे गाणं गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलं आहे.

'रणांगण'मधलं गुरू ठाकूरचं नवीन गाणं!
SHARES

'रणांगण' चित्रपटाचं नवं गाणं नुकतंच लाँच झालं आहे. या गाण्यात प्राजक्ता माळी गजाननाला साद घालताना दिसत आहे.

गणेशभक्तांच्या भावना व्यक्त करणारे या गाण्यातले शब्द लिहिले आहेत गुरू ठाकूर यांनी, तर शशांक पोवार यांनी संगीत दिलं आहे. वैशाली माडेच्या आवाजात म्हटलेलं हे गाणं गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलं आहे. आपल्या हक्कांची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेल्या युवकाची ही कथा आहे.


स्वप्निल जोशी साकारणार खलनायक

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असणारा स्वप्नील जोशी आता खलनायकाची भूमिका साकारणार आहे.  नेहमी गोड भूमिकांमधून आपल्या समोर आलेल्या स्वप्निलचा वेगळा लूक आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'रणांगण' या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि सचिन पिळगांवकर एकमेकांविरोधात उभे आहेत.


महागुरू ही वेगळ्या भूमिकेत

सचिन पिळगावकर 'रणांगण'मधून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर एक राजकारणी म्हणून येत आहे. शिक्षणमंत्र्यांची भूमिका ते साकारणार आहे. आतापर्यंत बालकलाकार ते दिग्दर्शक अशा सगळ्याच भूमिका सचिन पिळगावकर यांनी लिलाया पेलल्या. तितक्याच ताकदीने ते 'रणांगणा'तील डावपेच खेळताना दिसतील.




हेही वाचा

'न्यूड'च्या टीमसाठी आनंदाची बातमी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा