Advertisement

'यंटम'चा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद!


'यंटम'चा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद!
SHARES

बहुचर्चित यंटम चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज होताच त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.



सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत

रवी जाधव फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या यंटमचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे. काही वेळातच ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातून अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



नवी जोडी करणार पदार्पण

या चित्रपटात वैभव कदम आणि अपूर्वा शेळगावकर ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. यंटम मधून एक वेगळी प्रेम कथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'सनई बोलत नाही, ती थेट काळजात भिडते' असे प्रभावी संवाद या चित्रपटात आहेत. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

'न्यूड'ला सेन्सॉरचं 'ए' सर्टिफिकेट, प्रदर्शनाचा मार्ग मोकळा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा