Advertisement

‘बे एके बे’ साठी संजय बनला शिक्षक


‘बे एके बे’ साठी संजय बनला शिक्षक
SHARES

अभिनेता संजय खापरेने आजवर नेहमीच विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीसोबतच हिंदीतही काम करणारा संजय ‘बे एके बे’ या आगामी मराठी सिनेमात शिक्षक बनला आहे.

शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करत समाजातील सत्य परिस्थितीवर बोट ठेवणाऱ्या ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बॅनरखाली केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संचित यादव यांनी केलं असून कथा आणि पटकथालेखनही त्यांनीच केलं आहे.


गुरूजींच्या व्यक्तिरेखेला न्याय 

या सिनेमातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी यादव यांना एका सशक्त अभिनेत्याची गरज होती. कथा आणि व्यक्तिरेखा डोळयांसमोर ठेवून माधव गुरूजींच्या भूमिकेसाठी संजय खापरे यांची निवड केल्याचं यादव म्हणतात. संजय खापरे हे मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले अभिनेते आहेत. ‘बे एके बे’ मधील गुरूजींच्या व्यक्तिरेखेला तेच योग्य न्याय देऊ शकतील याची खात्री असल्यानेच त्यांची निवड केल्याचं यादव यांचं म्हणणं आहे.


आव्हानात्मक भूमिका

‘बे एके बे’ च्या निमित्तानं एक आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचं समाधान संजयच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. याबाबत तो म्हणाला की, या सिनेमाची कथा वर्तमान काळातील सत्य परिस्थितीवर आधारित आहे. समाजात आज जे घडतंय ते नाट्य रूपात मोठ्या पडद्यावर मांडत सर्वांच्याच डोळयांत अंजन घालणारी आहे. अशा एका आशयघन सिनेमातील माधव गुरूजींची भूमिका साकारण्यासाठी जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा कथा आणि व्यक्तिरेखा भावल्याने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. शिक्षण व्यवस्था आणि त्याच्या कारभारावर भाष्य करणारा सिनेमा असल्याने कथा ऐकल्यावरच भारावून गेलो होतो.


अरूण नलावडेही प्रमुख भूमिकेत

अभिजीत कुलकर्णी यांनी ‘बे एके बे’ चं संवादलेखन केलं आहे. अभिजीतच्या साथीने संचित यादव यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार विलास गुरव यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. संजयच्या जोडीला या सिनेमात जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ - यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका अाहेत.

साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदी बालकलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.



हेही वाचा -

'रे राया...'च्या गीतांना जावेद, कैलाश, वैशालीसह मंगेशचा सूर!

उत्सुकता सचिन दरेकरांच्या 'पार्टी' ची!


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा