Advertisement

बाळासाहेबांची भूमिका 'लार्जर दॅन लाइफ'- नवाजुद्दीन सिद्दीकी

आजवर आपण बऱ्याच भूमिका साकारल्या असल्या, तरी बाळासाहेबांची भूमिका ही आपल्यासाठी 'लार्जर दॅन लाइफ' असल्याचं सांगत नवाजुद्दीनने आपल्या भावना व्यक्त केल्या. बाळासाहेब ठाकरे हे एक पारदर्शी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे ही भूमिका जीवनभराचा अनुभव देणारी असल्याचंही नवाजुद्दीन म्हणतो.

बाळासाहेबांची भूमिका 'लार्जर दॅन लाइफ'- नवाजुद्दीन सिद्दीकी
SHARES

एकीकडे शिवसेनेचा ५२ वा वर्धापनदिन साजरा होत असताना दुसरीकडे ‘ठाकरे’ या सिनेमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीनने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

जीवनभराचा अनुभव

आजवर आपण बऱ्याच भूमिका साकारल्या असल्या, तरी बाळासाहेबांची भूमिका ही आपल्यासाठी 'लार्जर दॅन लाइफ' असल्याचं सांगत नवाजुद्दीनने आपल्या भावना व्यक्त केल्या. बाळासाहेब ठाकरे हे एक पारदर्शी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे ही भूमिका जीवनभराचा अनुभव देणारी असल्याचंही नवाजुद्दीन म्हणतो.

नवाजुद्दीन अचूक निवड

बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक अभिजीत पानसे जेव्हा योग्य कलाकाराच्या शोधात होते, तेव्हा त्यांच्या डोक्यात नवाजुद्दीनचा चेहरा होता. नवाजभाईंना सुरुवातीपासून ओळखत असल्यामुळे जेव्हा ते भेटायला मिटींग रूममध्ये आले, तेव्हा नजर त्यांच्यावर खिळली. तेव्हापासून तेच बाळासाहेब म्हणून डोक्यात फिट बसल्याचं या सिनेमाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत म्हणाले.

गांधींनंतर बाळासाहेबच

बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसांनाही सुपरमॅन बनवत त्यांना त्यांचा अधिकार मिळवून दिला. त्यामुळे महात्मा गांधींनंतर बायोग्राफी बनवण्यासाठी कोण योग्य असतील, तर ते बाळासाहेब ठाकरेच, असं मतही राऊत यांनी व्यक्त केलं.

अभिजीत पानसेंचं दिग्दर्शन

‘रेगे’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेले अभिजीत पानसे यांनी ‘ठाकरे’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. बाळासाहेबांच्या जीवनप्रवासातील आजवर कधीही समोर न आलेले काही पैलूही या सिनेमात पाहायला मिळणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. हा सिनेमा राऊटर्स एन्टरटेन्मेंटची निर्मिती आहे.

हेही वाचा-

मकरंदच्या ‘यंग्राड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘सॉरी’ मांडणार नाट्यकर्मीची कथा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा