Advertisement

नियमावलींचे पालन करत ‘या’ मराठी चित्रपटातील गाण्याचे शूटिंग पूर्ण


नियमावलींचे पालन करत ‘या’ मराठी चित्रपटातील गाण्याचे शूटिंग पूर्ण
SHARES

कोरोनाव्हायरसमुळे गेले तीन महिने मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण पूर्णतः ठप्प झाले होते. मात्र आता अवघ्या तीन महिन्यानंतर चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा झालेला आहे. सरकारनं दिलेल्या नियमावलींचे काटेकोर पालन करत संबंध मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याच्या वाटेवर जोमानं काम करत आहे.

सरकारनं दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करत आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेत 'डॉक्टर डॉक्टर' या चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण पुन्हा एकदा नव्या जोमानं पार पाडलं. लॉकडाऊननंतर वेळ न दवडता त्याच्या आगामी 'डॉक्टर डॉक्टर' या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण सह कलाकार आणि इतर टीमच्या साहाय्यानं यशस्वी रित्या पूर्ण केलं.

'डॉक्टर डॉक्टर' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या 'खिचिक' या चित्रपटानंतर त्यांचा हा नवाकोरा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस ते आगळ्या वेगळ्या विषयाच्या कल्पकतेने घेऊन आले आहेत. 'डॉक्टर डॉक्टर' चित्रपटाची निर्मिती सागर पाठक, सूरज दगडे पाटील, किरण कुमावत यांनी केली आहे. सहयोगी निर्माता म्हणून अभिनेता, निर्माता अमोल कागणेचा महत्वाचा वाटा आहे.

विशेष म्हणजे निर्मिती क्षेत्रात पारंगत असलेल्या अमोलनं या त्याच्या 'डॉक्टर डॉक्टर' चित्रपटात भूमिका साकारली आहे. अमोल सह या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, विद्यान माने मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे अमोलचे एकाच चित्रपटातील निर्मिती आणि अभिनय कौशल्ये पाहण्यास प्रेक्षकांना औतस्युक्याचे ठरेल.

तर 'राजकारण २०१४', 'लग्न मुबारक' सारख्या चित्रपटाच्या यशानंतर निर्माते सागर पाठक 'डॉक्टर डॉक्टर' या चित्रपटाच्या निर्मितीतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. याबद्दल सागर पाठक म्हणाले की, हा नवाकोरा चित्रपट मी सिनेप्रेमींकरिता घेऊन येत असून प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की येईल यांत शंकाच नाही.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा