Coronavirus cases in Maharashtra: 510Mumbai: 278Pune: 57Islampur Sangli: 25Ahmednagar: 20Nagpur: 16Navi Mumbai: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 10Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Ratnagiri: 2Kolhapur: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Nashik: 1Washim: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 21Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

पश्चिम बंगालमध्ये चित्रीत होतोय मराठी सिनेमा

दिवसेंदिवस मराठी सिनेमांच्या कक्षा रुंदावत आहेत. आज मराठी सिनेमांचं शूटिंग जसं विदेशात होत आहे, तसं देशातील विविध भागांमध्येही होत आहे. 'आवंछित' हा आगामी मराठी सिनेमा पश्चिम बंगालमध्ये चित्रीत होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये चित्रीत होतोय मराठी सिनेमा
SHARE

दिवसेंदिवस मराठी सिनेमांच्या कक्षा रुंदावत आहेत. आज मराठी सिनेमांचं शूटिंग जसं विदेशात होत आहे, तसं देशातील विविध भागांमध्येही होत आहे. 'आवंछित' हा आगामी मराठी सिनेमा पश्चिम बंगालमध्ये चित्रीत होत आहे.


पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना त्यांच्या बलाढ्य संस्कृती आणि परंपरांचा वारसा आहे. दोन्हीमध्ये बऱ्यापैकी साधर्म्यही आहे. कला-साहित्य-संस्कृतीसह निसर्ग रचनेत कमालीचं साम्य आढळून येतं. पश्चिम बंगालचं हे वैभव पहाण्याची संधी दिग्दर्शक शोभो बासू नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, विकी शर्मा सहयोगी निर्माते त्यांच्या फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट' प्रस्तुत 'अवांछित' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पश्चिम बंगालच्या जुन्या आणि नव्या कोलकाता शहरात सुरू झालं आहे.


'अवांछित'मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून, ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणं विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळंच आईनं जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या भावविश्व, नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते. कसलेल्या मराठी कलावंतांसोबत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी बंगाली कलावंतांनीही कंबर कसली आहे. मराठी प्रमुख कलावंतांसोबतच पडद्यामागील बहुतांश कलावंत बंगाली आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत प्रथम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शक शोभो बासू नाग यांना दोन दशकांचा मीडिया क्षेत्रातला अनुभव आहे. 'दिवानगी', 'ख्वाईश', 'देवदास' या चित्रपटांच्या संकलनानं त्यांनी सुरुवात केली. उत्कृष्ट स्टोरीटेलर असलेल्या शोभो यांनी जाहिरात, चित्रपटांसोबतच 'झी नेटवर्क'च्या 'कोर क्रिएटिव्ह टीम' अंतर्गत 'सीक्रेट सुपरस्टार्स', 'रुस्तम', 'करीब करीब सिंगल', 'मणिकर्णिका' अशा अनेक चित्रपटांसाठी काम पाहिलं असून, 'स्टार आनंद', 'टाइम्स नाऊ', 'झी कॅफे', 'झी स्टुडिओ', 'झी बांगला', 'झी बांगला सिनेमा', 'झी अनमोल' या चॅनल्सच्या निर्मितीत योगदान दिलं आहे.

'गणवेश' या महत्वाकांक्षी मराठी चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन करणारे युवा सिनेमॅटोग्राफर अतुल जगदाळे 'अवांछित' चित्रपटासाठी डीओपी आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर बनून मराठी आणि बंगाली कलावंतांमध्ये दुवा साधत आहेत. या चित्रपटात अभिनेते किशोर कदम एका वेगळ्याच रूपात दिणार असून, अभय महाजन व मृण्मयी गोडबोले या तरुण जोडगोळीसोबतच मृणाल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण यांसह बंगाली अभिनेते बरून चंदा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण कोलकातामध्ये झालं आहे. मात्र, प्रथमच संपूर्ण मराठी चित्रपटाचं चित्रीकरण या शहरात होत आहे. हेही वाचा -

अमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का?

'हा' सिनेमा पाहून हिरानींना आठवले जुने दिवस
संबंधित विषय
संबंधित बातम्या