Advertisement

महाराष्ट्राच्या इतिहासातील शूरवीर मावळे खेळण्यांच्या रूपात

आता महाराष्ट्राच्या लाल मातीत होऊन गेलेले हेच सुपरहिरो खेळणी रूपात अवतरणार आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासातील शूरवीर मावळे खेळण्यांच्या रूपात
SHARES

'स्पायडरमॅन', 'बॅटमॅन', 'सुपरमॅन', 'अॅव्हेंजर्स' हे सुपरहीरोज खेळण्यांच्या माध्यमातून थेट रसिकांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. प्राणांची बाजी लावून पराक्रम गाजवत इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झालेले खरे सुपरहिरो महाराष्ट्रालाही लाभले आहेत.

आता महाराष्ट्राच्या लाल मातीत होऊन गेलेले हेच सुपरहिरो खेळणी रूपात अवतरणार आहेत. पावनखिंड' या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून आलमंड्स क्रिएशन्स तर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

हॅालिवूडपटांमधले सुपरहीरोज काल्पनिक आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अजरामर झालेले मावळे हे खरे आहेत. हे शूरवीर मावळेच खरे सुपरहिरो होते आणि आहेत. आजच्या काळात या सर्व खऱ्याखुऱ्या सुपरहीरोजची माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे.

'पावनखिंड' या सिनेमाच्या निमित्तानं अशा प्रकारचा पहिला प्रयत्न करण्यात आला आहे. 'पावनखिंड' या चित्रपटात प्राणपणानं लढणारे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजीराव बांदल, श्रीमंत कोयाजीराव बांदल यांच्यासह बांदल सेनेतील काही निवडक शूरवीर मावळे आकर्षक खेळण्यांच्या रूपात लहान मुलांपर्यंत पोहोचणार आहेत.

लहान मुलांचा खेळही व्हावा आणि त्यांना शिवकालीन इतिहासाची माहितीही मिळावी असा दुहेरी हेतू यामागे आहे. पुढच्या पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचवण्याचं काम त्यामुळं सोपं होणार आहे. खेळता-खेळता त्यांच्या मनावर इतिहासाची माहिती कोरली जाईल.

मोल्डींगची ही खेळणी अत्याधुनिक प्लास्टिक फॅारमॅटमध्ये आहेत. मजबूत, आकर्षक आणि टिकाऊ असलेली ही खेळणी आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुकानांसह सर्व मॅाल्समध्ये ही खेळणी पोहोचणार आहेत.

'पावनखिंड' प्रदर्शित होण्यापूर्वी ही बच्चे कंपनींपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाचे नियम आणि अटी खेळण्यांसोबतच देण्यात आले आहेत.

'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि अनिरुद्ध आरेकर या निर्मात्यांनी केलेला हा अनोखा प्रयत्न प्रादेशिक चित्रपटांमध्ये आणि त्यातही मराठीत प्रथमच होताना दिसत आहे.

ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित 'पावनखिंड' ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचं लेखन–दिग्दर्शन केलं आहे. 'पावनखिंड' १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.



हेही वाचा

नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा