जूनमध्ये फुलणार स्वप्नीलचा 'मोगरा...'

स्वप्नीलची मुख्य भूमिका असलेल्या या आगामी सिनेमाचं शीर्षकच 'मोगरा फुलला' असं काहीसं सुगंधी आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार झाला आहे.

SHARE

अभिनेता स्वप्नील जोशी जेव्हा एखाद्या सिनेमात दिसणार असतो, तेव्हा त्याकडं आपोआपच सर्वांचं लक्ष वेधलं जातं. 'मुंबई पुणे मुंबई ३'नंतर 'मी पण सचिन' या सिनेमात दिसलेल्या स्वप्नीलचा येत्या जून महिन्यात 'मोगरा' फुलणार आहे.


लुक रिव्हील

स्वप्नीलची मुख्य भूमिका असलेल्या या आगामी सिनेमाचं शीर्षकच 'मोगरा फुलला' असं काहीसं सुगंधी आहे. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील स्वप्नीलचा अनोखा लुक रिव्हील करण्यात आला आहे. तेव्हापासूनच हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याचे वेध सर्वांना लागले होते.


१४ जूनचा मुहूर्त

ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स) च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी १४ जूनचा मुहूर्त काढण्यात आला आहे. या चित्रपटात साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख यांच्याही भूमिका आहेत.


प्रेमकथा

श्रावणी देवधर यांनी यापूर्वी 'लपंडाव', 'सरकारनामा', 'लेकरू' या गाजलेल्या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळेच 'मोगरा फुलला' या सिनेमाकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यात या सिनेमात स्वप्नीलसारखा आघाडीचा अभिनेता असल्यानं यात नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुंफलेली प्रेमकथा आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ही कथा फिरते. त्याच्या या समस्यांमुळं त्याच्या लक्षातही येत नाही की, आपलं लग्नाचं वय उलटून गेलं आहे. एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा पुढे सरकलेली असते.हेही वाचा - 

'फिरस्ते महाराष्ट्राचे' चा ‘एकदम कडक’ परफाॅर्मन्स

Movie Review : सत्य शोधार्थ रचलेलं रोमांचक सूडचक्र
संबंधित विषय
ताज्या बातम्या