Advertisement

'फिरस्ते महाराष्ट्राचे' चा ‘एकदम कडक’ परफाॅर्मन्स

‘एकदम कडक’मध्ये आतापर्यंत मांडव महाराष्ट्राचा, सामना महाराष्ट्राचा, किनारा महाराष्ट्राचा या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांनी विशिष्ट परफॉर्मन्सेस पाहिले आहेत. आता या शोमध्ये या आठवड्यात महाराष्ट्राच्या अस्सल मातीतले कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

'फिरस्ते महाराष्ट्राचे' चा ‘एकदम कडक’ परफाॅर्मन्स
SHARES

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘एकदम कडक’ या कार्यक्रमानं जनमानसात दडलेल्या लोककला आणि ते सादर करणाऱ्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं आहे. त्यामुळं लोप पावू पाहात असलेल्या लोककला छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहेत. आता ‘एकदम कडक’मध्ये प्रेक्षकांना 'फिरस्ते महाराष्ट्राचे' चा धमाकेदार परफाॅर्मन्स पाहायला मिळणार आहे.


अस्सल मातीतले कलाकार

‘एकदम कडक’मध्ये आतापर्यंत मांडव महाराष्ट्राचा, सामना महाराष्ट्राचा, किनारा महाराष्ट्राचा या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांनी विशिष्ट परफॉर्मन्सेस पाहिले आहेत. आता या शोमध्ये या आठवड्यात महाराष्ट्राच्या अस्सल मातीतले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यांना ना आमंत्रणाची गरज, ना रंगमंचाची अट… डोक्यावर निळ्या आभाळाचा मंडप असला की पायाखालच्या मातीचा रंगमंच बनवून ‘फिरस्ते महाराष्ट्राचे’ आपली कला सादर करतात. 


नाचतो डोंबारी

हेच कलाकार या आठवड्यात ‘एकदम कडक’चा मंच गाजवणार आहेत. मन प्रसन्न करणारी यांची कला बघून सर्वजण थक्क होतात. नाटकासाठी मंच असतो, भारुड, किर्तनाचे सप्ताह होतात, कव्वालीचे जंगी सामने होतात, पण यांना मात्र आमंत्रण देऊन बोलावलं जात. असं असलं तरी ते आले की त्यांना कुणी जाऊ देत नाही हेही तितकंच खरं आहे. डोंबाऱ्यांची कला, रॅपर ऋषिकेश जाधवचा धम्माकेदार अॅक्ट, कडूबाई खरात यांचं गाणं तसंच ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील आपल्या सगळ्याची लाडकी लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकरचं ‘बाई माझी करंगळी मोडली…’ या गाण्यावरील नृत्य या आठवड्यात पाहायला मिळेल. या भागात सुकन्या कालन देखील ‘नाचतो डोंबारी…’ या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे.



हेही वाचा - 

Movie Review : सत्य शोधार्थ रचलेलं रोमांचक सूडचक्र

सुखाचा शोध घेत हाॅलिवूडला निघाला मराठी सिनेमा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा