Advertisement

क्यूआरटीची कथा सांगणारा 'लालबत्ती'चा टीझर

बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये ज्वलंत विषय आणि सत्य घटनांवर आधारीत कथा सादर केल्या जातात. 'लाल बत्ती' या आगामी मराठी चित्रपटातही अशाच प्रकारचं कथानक पहायला मिळणार असल्याचं टीझर पाहिल्यावर जाणवतं.

क्यूआरटीची कथा सांगणारा 'लालबत्ती'चा टीझर
SHARES

बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये ज्वलंत विषय आणि सत्य घटनांवर आधारीत कथा सादर केल्या जातात. 'लाल बत्ती' या आगामी मराठी चित्रपटातही अशाच प्रकारचं कथानक पहायला मिळणार असल्याचं टीझर पाहिल्यावर जाणवतं.


मंगेशचा नवा अवतार 

आपल्या आजवरच्या सर्वच चित्रपटांमधील व्यक्तिरेखांसाठी कसून मेहनत घेणाऱ्या अभिनेता मंगेश देसाईनं 'लाल बत्ती' या चित्रपटासाठी कठोर परिश्रम घेत पोलिसांचं प्रशिक्षण घेतलं आहे. 'लाल बत्ती' या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणाऱ्या मंगेशचा नवा अवतार नुकत्याच प्रदर्शित झालेल्या उत्कंठावर्धक टीझरमध्ये पहायला मिळतो. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या 'क्यूआरटी' म्हणजेच क्विक रिस्पॉन्स टीमविषयी या टीझरमधून सांगण्यात आलं आहे. 'क्यूआरटी' टीमला देण्यात येणाऱ्या खडतर प्रशिक्षणाची झलक 'लाल बत्ती'च्या टीझरमध्ये पहायला मिळते. 


२६ जुलैला प्रदर्शित

जिगरबाज पोलिसांची कहाणी उलगडणाऱ्या 'लाल बत्ती' या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांनी लिहिली आहे, तर अरविंद जगताप यांनी संवादलेखन केलं आहे. छायाचित्रण कृष्णा सोरेन यांनी केलं असून, निलेश गावंड यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. २६ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या कथेला साजेसं असं संगीत अविनाश-विश्वजीत या जोडीनं दिलं आहे.

लिंक  - https://youtu.be/Crexik5kSwk



हेही वाचा -

बिग बॉसमध्ये कोण बनणार 'शेरास सव्वा शेर'?

कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा